Home | Sports | Other Sports | Sailing series in organized Frans

५९ देशांचे ७०० सेलर सहभागी; वर्ल्ड सिरीजचे प्रतिभावंत खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये ३० पैकी २८ पदकाचे मानकरी

वृत्तसंस्था | Update - Apr 17, 2019, 09:46 AM IST

सेलिंग वर्ल्डकप सिरीज फ्रान्समध्ये आयोजित; २००८ मध्ये पहिले आयोजन; यंदाचे १२ वे सत्र

 • Sailing series in organized Frans

  मार्सेल-फ्रान्सच्या मार्सेल येथे १२ व्या सेलिंग वर्ल्डकप सिरीजला सुरुवात झाली. ऑलिम्पिक स्पर्धेनंतर ही जगातील सर्वात मोठी दुसरी टुर्नामेंट मानली जाते. २००८ पासून या सिरीजचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे या स्पर्धेच्या आयोजनाचे हे १२ वे सत्र आहे. या सिरीजमध्ये यंदा ५० देशांतील ७०० रेसरने सहभाग नोंदवला आहे. सर्व १२ सत्रांपर्यंत या सिरीजचा अभ्यास केला तर, आतापर्यंत एकूण ७५ देशांतील २ हजारांपेक्षा अधिक सेलरने आपले काैशल्य पणास लावले आहे. त्यामुळे या इव्हेंटला महत्त्वाचे मानले जाते. कारण, २०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारे ३० पैकी २८ सेलर हे याच सिरीजमधून आलेले आहेत.

  1. मोनोहल: या नावेत एक नावाडी (स्पर्धक) असतो. पाण्याच्या प्रवाहात जाण्यास सक्षम.

  2. मल्टिहल: एकापेक्षा अधिक सेलर. सर्व कनेक्ट. वेगवान वाऱ्यातही नाव योग्य प्रकारे हाकण्यास सर्वांची मदत

  3. विंडसर्फर: वेगाची हवा, वेगवान प्रवाहात ही नाव वापरतात. याचा वापर खासकरून सर्फिंगसाठी.

  4. काइट बोर्डर: स्नो बोर्डिंगसारखेच पाण्यावर बोर्डिंगसाठी या काइट बोर्डर नावेचा वापर करण्यात येतो.

  इटलीच्या तीता आणि बांतीने गतवर्षी रेस जिंकली

  इटलीच्या तीता आणि बांतीने गत वर्षी ही रेस जिंकली होती. यंदाच्या या स्पर्धेत न्यूझीलंड संघाने आघाडी मिळवली. त्यामुळे आता या दोघांना किताबावरचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी कसरत करावी लागेल. त्यांनी युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र, त्यांना ट्रोफियो सेलिंग स्पर्धेत अपयश आले.

Trending