आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायनाला वर्षभरात साडेपाच काेटी; सर्वाधिक कमाईच्या टाॅप-5 मध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्यावसायिक बॅडमिंटनपटूंना करिअरमध्ये बक्षिसांची रक्कम अाणि जाहिरातींच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई करण्याची संधी असते. नुकतीच या खेळाच्या सर्वात माेठ्या बीडब्ल्यूएफनेही याच्या अांतरराष्ट्रीय स्पर्धेतील बक्षिसांच्या रकमेत वाढ केली. त्यामुळे पदक विजेत्या खेळाडूंवर काेट्यवधी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव हाेताेे.  


एका अहवालानुसार सायना नेहवाल ही याच सर्वाधिक कमाईच्या टाॅप-५ च्या यादीमध्ये झळकली. तिने या यादीत पाचव्या स्थानी धडक मारली. तिची वर्षाकाठची कमाई  साडेपाच काेटी अाहे. यामुळे या उत्पन्नाच्या बाबतीत  सायना ही सर्वाधिक कमाई करणारी जगातील दुसरी खेळाडू ठरली. मलेशियाचा ली चाेंग वेई हा अव्वल स्थानी अाहे.  तैवानची यिंग ही सर्वाधिक कमाई करणारी खेळाडू अाहे. 


सायना विजयी : सायना व श्रीकांतने फ्रेंच अाेपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. सायनाने  अाेकुहारावर २-१ ने मात केली. 

 

आठ काेटींसह चेन दुसऱ्या स्थानावर  
1. अाॅलिम्पिकमध्ये 3 राैप्य जिंकणारा ली चाेंग वेई अव्वल मलेशियाच्या ली चाेंग वेईची वर्षभरातील कमाई ही साडेतेरा काेटींची अाहे.  ताे कॅन्सरमुळे काेर्टपासून दूर अाहे.  वेईने अाॅलिम्पिकमध्ये 3 राैप्य व  नावे 69 पदकांची नाेंद अाहे.  


2. अाॅलिम्पिक चॅम्पियन चेन लाेंग दुसऱ्या स्थानावर :   चीनचा चेन लाेंग हा वर्षभरात 8 काेटींची कमाई करताे. त्याने जागतिक स्पर्धेत दाेन पदके जिंकली. त्याने करिअरमध्ये अातापर्यंत 29विजेतपेद पटकावले.  


3. नंबर वन ताई जू यिंग तिसऱ्या स्थानावर :  तैवानची ताई जू यिंग ही वर्षाकाठी साडेसात काेटी कमावते. तिच्या नावे सलग 67 अाठवडे नंबर वन राहण्याचा विक्रम नाेंद अाहे. तिने एशियन गेम्समध्ये सुवर्ण व कांस्य पटकावले. तिने 16 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली.

 
4. सुपर ग्रँडस्लॅम विजेत्या लीनला 7 काेटी  : चीनचा लीन डॅनचे 7 काेटींचे उत्पन्न अाहे. त्याच्या  नावे  9 मेजर मेडल म्हणजे सुपर ग्रँडस्लॅम अाहे.  तो दाेन वेळा अाॅलिम्पिक व पाच वेळा वर्ल्ड अाणि सहा वेळचा अाॅल इंग्लंड चॅम्पियन अाहे.

 
5. अाॅलिम्पिक पदक जिंकणारी सायना पहिली भारतीय :  सायनाने अाॅलिम्पिकमध्ये भारताला बॅडमिंटनचे पहिले पदक मिळवून दिले. तिने 2012 लंडन अाॅलिम्पिकमध्ये कांस्य जिंकले हाेते. तिने राष्ट्रकुलमध्ये 3 सुवर्ण, एक राैप्य व एक कांस्य पटकावले. जागतिक स्पर्धेत प्रत्येकी एक राैप्य व कांस्यचीही तिच्या नावे नाेंद अाहे.

बातम्या आणखी आहेत...