आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​सायना केवळ 24 मि. पराभूत; एकेरीत आव्हान संपुष्टात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुजोऊ : जागतिक चॅम्पियन पी. व्ही. सिंधूनंतर आता सायना नेहवालदेखील चायना ओपन बॅडमिंटनमध्ये पहिल्याच फेरीत पराभूत झाली. तिच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. २०१४ ची चॅम्पियन सायनाला चीनच्या केई यान यानने २१-०९, २१-१२ ने हरवले. आठव्या मानांकित सायनाला बिगरमानांकित चीनच्या खेळाडूने केवळ २४ मिनिटांत हरवले. हा दोन्ही खेळाडूतील पहिला सामना होता. सायना तिसऱ्या स्पर्धेतून पहिल्या फेरीत बाहेर झाली. यादरम्यान, पुरुष एकेरीत पी. कश्यप आणि बीसाईप्रणीत दुसऱ्या फेरीत पोहोचले. समीर वर्माला पराभवाचा सामना करावा लागला. कश्यपने थायलंडच्या सितीकोम थामासिनला २१-१४, २१-१३ ने हरवले. कश्यप ४४ मिनिटांत विजयी होत प्री क्वार्टर फायनलमध्ये पाेहोचला. आता त्याचा सामना सातव्या मानांकित डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्लेलसनशी होईल. जागतिक चॅम्पियनशिपचा कांस्य विजेता प्रणीतने इंडोनेशियाच्या टॉकी सुगियार्तोला १५-२१, २१-१२, २१-१० ने मात दिली. प्रणीत ५२ मिनिटात विजयी झाला. प्री क्वार्टर फायनलमध्ये त्याचा सामना चौथ्या मानांकित डेन्मार्कच्या अँडर्स अंटोनसेनशी होईल. समीरला हाँगकाँगच्या ली चुक इयूने ४५ मिनिटांत २१-१८, २१-१८ ने हरवले.
 

बातम्या आणखी आहेत...