आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saina Demand Fell 32% In September Quarter To 123 Tonnes, 236.8 Tonnes In Last Year: WGC

सप्टेंबर तिमाहीत साेन्याची मागणी 32 % घटून 123 टनांवर, गेल्या वर्षात 236.8 टन हाेती : डब्ल्यूजीसी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : जुलै- सप्टेंबर तिमाहीच्या कालावधीत देशातील साेन्याच्या मागणीत वार्षिक ३२.३७ % घट हाेऊन ती १२३.९ टनांवर आली. ही मागील वर्षाच्या याच तिमाहीमध्ये १८३.२ टन हाेती. याच प्रमाणे देशातील साेन्याची आयात ६६.०१ टक्क्यांनी कमी हाेऊन ती ८०.५ टनांवर आली आहे. मागील वर्षात याच कालावधीत ती २३६.८ टन हाेती अशी माहिती वर्ल्ड गाेल्ड काैन्सिलच्या (डबल्यूजीसी) अहवालात दिली आहे. अहवालानुसार चीननंतर भारत हा साेन्याचा दुसरा सर्वात माेठा ग्राहक देश आहे. डब्ल्यूजीसी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक साेमसुंदरम पीआर म्हणाले, भारतात साेन्याची मागणी दाेन कारणांमुळे कमी झाली आहे. साेन्याच्या किंमती हे पहिले कारण आहे. जून तिमाही अखेर सप्टेंबर तिमाही अखेरपर्यंत साेन्याच्या किंमतींमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारत- चीनसह विविध देशात आलेल्या आर्थिक नरमाईमुळे ग्राहकांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याने ग्राहकांनी साेने खरेदी टाळली. त्यामुळे देखील साेन्याची मागणी घटली आहे. सप्टेंबरमध्ये १० ग्रॅम साेन्याची किमत ३९,०११ रुपयांवर गेली. सध्याही या किंमती चढ्याच आहेत.

ग्रामीण मागणी कमी झाल्याने आयातीत घट
चढ्या किंमती आणि मागणी आटल्याने साेन्याच्या आयातीत वेगाने घट झालेली दिसून आली. सराफ्यांनी आधीच आयात केलेला साेन्याचा साठा तसेच रिसायकलींगच्या माध्यमातून आपली मागणी पूर्ण केली. देशात रिसायकलिंग साेन्याचे एकूण प्रमाण जानेवारी ते सप्टेंबरमध्ये वाढून ९०.५ टन झाले. २०१८ च्या पूर्ण वर्षात हे प्रमाण ८७ टन हाेते. सप्टेंबरमध्ये १२३.९ टनांच्या साेन्याच्या एकूण मागणीत १०१.६ टन दागिने, २२.३ टन नाणि आणि बिस्किटांच्या मागणीचा समावेश हाेता.

वर्षाच्या ९ महिन्यांत मागणीत ५.३ % घट
अहवालानुसार २०१९ वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांमध्ये देशात साेन्याची एकूण मागणी ५.३० घटून ४९६.११ टन राहिली. गेल्या वर्षाच्या जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ही मागणी ५२३.९ टनांपर्यंत गेली हाेती. तसेच जानेवारी - सप्टेंबर २०१९ मध्ये साेन्याची एकूण आयात वार्षिक आधारावर १४.३७ % घटून ५०२.९ टन झाली. गेल्या वर्षात याच कालावधीत ती ५८७.३ टन हाेती. गेल्या वर्षात साेन्याची एकूण मागणी देशात ७६०.४ टन हाेती तर देशात साेन्याची एकूण आयात ७५५.७ टनांची झाली हाेती.
 

बातम्या आणखी आहेत...