Home | Sports | Other Sports | saina nehwal enter in sudiraman cup badminton championship

सुदीरमन चषक बॅटमिंटन स्पर्धेत सायना नेहवालची विजयी आघाडी

Agency | Update - May 27, 2011, 01:07 PM IST

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिला एकेरीत अव्वल मानांकित चीनच्या वांग जीनला २१-१५, २१-११ गुणांच्या आघाडीने पराभवाची धूळ चारत सुदीरमन चषक विजयी आघाडी घेतली.

  • saina nehwal enter in sudiraman cup badminton championship

    किंगदानो - भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिला एकेरीत अव्वल मानांकित चीनच्या वांग जीनला २१-१५, २१-११ गुणांच्या आघाडीने पराभवाची धूळ चारत सुदीरमन चषक विजयी आघाडी घेतली. महिला ऐकरीत सायनाविरुद्ध वांग जीन यांच्यामध्ये शर्थीची लढत झाली. पहिल्या सेटवर सायनाने आक्रमक प्रदर्शन करून वांग जीनवर २१-१५ च्या गुणांनी बाजी मारली. याच आव्हानाला राखून ठेवणाऱ्या सायनाने दुसऱ्या सेटवरही आक्रमक खेळीचे प्रदर्शन केले. वांग जीनला २१-११ च्या आघाडीने पराभवाची धूळ चारून सायनाने स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

    दुहेरीत भारताला अपयश
    सुदीरमन चषक बॅटमिंटन स्पर्धेत सायनाच्या विजयानंतरही भारताला दुहेरीतील अपयशामुळे पराभवाचा धक्का बसला. यामध्ये थॉमस व रूपेशकुमार या जोडीला युन-हैफेंग जोडीने २१-१४, २१-१५च्या गुणांनी पराभवाचा धक्का दिला. त्या पाठोपाठच पुरुष एकेरीत राष्ट्रकुल कांस्यपदक विजेता कस्यपला थॉयलंडच्या पोन्सानाने पराभवाचा धक्का दिला.

Trending