Home | Khabrein Jara Hat Ke | Saina Nehwal's biopic on hold

ऑन होल्ड/ पुन्हा पुढे ढकलली सायना नेहवालच्या बायोपिकची शूटिंग, श्रध्दा कपूरने ABCD 3 ला दिल्या डेट्स

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 13, 2019, 12:00 AM IST

सप्टेंबरपासून बंद आहे शूटिंग 

 • Saina Nehwal's biopic on hold

  एन्टटेन्मेंट डेस्क. बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा बायोपिक बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अमोल गुप्ते दिग्दर्शित या चित्रपटात श्रद्धा कपूर काम करत आहे. खूप दिवसांपासून ती याची तयारी करत होती. सरावादरम्यान श्रद्धाला आणखी तयारी करण्याची गरज असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे होते. त्यामुळे निर्मात्यांनी श्रद्धाला चित्रपटासाठी तयारी करायला वेळ दिला होता. दरम्यान श्रद्धा आपल्या दुसऱ्या चित्रपटाचे शूटिंग करत राहिली. शेवटी या चित्रपटाचे काम फायनल झाले मात्र श्रद्धाला डेंंग्यू झाल्यामुळे पुन्हा त्याचे काम रखडले. तेव्हापासून याचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही. आता हा चित्रपट पुन्हा थांबवण्यात आल्याची चर्चा आहे. श्रद्धाने सायनाच्या तारखा 'ABCD 3' ला दिल्या आहेत. या दोन्ही चित्रपटाचा निर्माता भूषण कुमार आहे. आता सायना बायोपिकचे निर्माते हा चित्रपट दुसऱ्या एखाद्या अभिनेत्रीसोबत सुरू करू शकतात.

  सप्टेंबरपासून बंद आहे शूटिंग

  चित्रपटाच्या निर्मात्यांनी गेल्या वर्षी हा फोटो शेअर केला होता. यात दिग्दर्शक अमोल गुप्ते, श्रद्धा कपूर आणि निर्माते भूषण कुमार दिसत आहेत. हा फोटो चित्रपटाच्या मुहूर्त शॉचा आहे, ते २५ सप्टेंबर २०१८ मध्ये झाले होते. याच्या दोन आठवड्यानंतर श्रद्धाला डेंगू झाला होता. त्यानंतर तिने एक महिना विश्रांत घेतली. तेव्हापासून आजपर्यंत याचे शूटिंग रखडले आहे


  तर जाणून घेऊन कोणती अभिनेत्री या भूमिकेसाठी योग्य असेल....

  दीपिका पदुकोण
  या चित्रपटासाठी दीपिका निर्मात्यांची सर्वात पहिली पसंत असायला हवी. कारण तिचे वडील प्रकाश पदुकोन उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू राहिलेले आहेत. स्वत: दीपिकादेखील राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळली आहे. त्यामुळे तिला चित्रपटासाठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही. दीपिकाला पीव्ही सिंधूच्या बायोपिकसाठीदेखील योग्य मानले जाते.

  सारा अली खान
  सारा अली खानने गेल्या वर्षी 'केदारनाथ' मधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. ती स्वत:ही खेळाडू कुटुंबातील आहे. शिवाय तिलादेखील खेळाची अावड आहे. तीदेखील या चित्रपटासाठी परफेक्ट निवड ठरू शकते.

  दिशा पाटणी
  दिशा पाटणीने निवडक चित्रपट केले आहेत. सध्या तिच्याकडे मोजकेच चित्रपट आहेत. तिची बॉडी एखाद्या खेळाडूप्रमाणे आहे. त्यामुळे ती खेळाडूच्या भूमिकेत चांगली दिसू शकते. शिवाय ती वेगवेगळ्या कसरती करतानाचे आपले फोटो वेळोवेळी शेअर करत असते. थोडेसे प्रशिक्षण िदले तर ती सायनाच्या भूमिकेसाठी परफेक्ट आहे.

Trending