आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ नर्सीतील विकासकामांत प्रशासन ‘चुना’ लावणार!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आठ महिन्यांवर ७५० वा जयंती सोहळा, अद्याप सल्लागारांची नियुक्तीही नाही
  • प्रशासनाचा निर्णय : इमारतींच्या उभारणीत सिमेंटऐवजी चुन्याचा वापर करणार

मंगेश शेवाळकर

हिंगोली - संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे ७५० व्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रम घेतले जाणार आहेत. मात्र अवघ्या आठ महिन्यांवर हा सोहळा येऊन ठेपल्यानंतरही विकासकामांना साधी सुरुवातही नाही. नर्सीतील विकास कामे चुन्यातच करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आता सल्लागार शोधण्यापासून तयारी सुरू असल्याने आता विकास कामे होणार तरी कधी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभरात फडकवणारे संत नामदेव महाराज यांचे महाराष्ट्रासह पंजाबमध्ये  मोठे कार्य आहे.    संत नामदेव महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या नर्सी नामदेव येथे भारतातीलच नव्हे तर बाहेर देशातूनही भाविक  येतात. यावर्षी नोव्हेंबरमध्ये  महाराजांची ७५० वी जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी विकास कामे होण्यासाठी आमदार तान्हाजी मुटकुळे, बाजार समितीचे माजी सभापती रामेश्वर शिंदे पाटील केसापूरकर यांच्यासह भाविकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातूनच लोकवर्गणीमधून सुमारे पाच कोटी रुपये खर्चून मंदिराचे बांधकाम उभे राहिले आहे. तर ७५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर अखंडपणे चालणारा सप्ताह रामेश्वर शिंदेंच्या पुढाकारातून सुरू आहे. जयंती निमित्त येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विकास कामे करावी अशी मागणी आ. मुटकुळे यांनी केली होती. त्यानंतर तत्कालीन युती सरकारने १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे.  पैकी केवळ ३ कोटीच प्राप्त झाले आहेत. या निधीतून सा. बां. विभागाने भक्तनिवास, दर्शन व्यवस्था, वाहनतळ यासह इतर सुविधांचे प्रस्ताव तयार केले. मात्र ही कामे सिमेंटऐवजी चुन्यात करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडूनही पाठपुरावा होत आहे.   या ठिकाणी होणारे बांधकाम दीर्घकाळ टिकावे तसेच वातावरणाचा त्यावर परिणाम होऊ नये यासाठी हे बांधकाम चुन्यामध्ये केले जाणार असल्याचे बांधकाम विभागाकडून सांगितले जात आहे. तर पावसाचे पाणी भिंतीमध्ये न मुरता थेट जमिनीवर पडते, असे सांगितले जातेय....पण विकासकामांचे काय?

नर्सी नामदेव येथे जयंती सोहळ्यानिमित्त शासकीय पातळीवर समिती स्थापन झाली आहे. मात्र आठ महिन्यांत कामांच्या निविदा, कार्यारंभ आदेश यासाठी माेठा कालावधी लागणार आहे.  पावसाळ्यात कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता असल्याने विकास कामांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.सल्लागारांसाठी निविदा मागवल्या 

नर्सी नामदेव येथे उभारल्या जाणाऱ्या इमारती व इतर कामे चुन्यात केली जाणार आहेत. मात्र चुन्याचे काम करणारे कंत्राटदार कमी आहेत. त्यामुळे सल्लागार व पर्यवेक्षणासाठी निविदा मागवल्या आहेत. बुधवारी निविदा काढल्या जातील. त्यानंतर  कामांच्या निविदा  निघतील.
-व्ही. एन. मिठ्ठेवाड, प्रभारी कार्यकारी अभियंतासल्लागार शोधण्यापासून तयारी


या ठिकाणी चुन्यात बांधकाम करावयाचे असल्याने त्यासाठी विशेष सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागार नियुक्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने निविदा काढली आहे. त्याला कितपत प्रतिसाद मिळणार हा देखील मोठा प्रश्न आहे. महाराष्ट्रात चुन्यात बांधकाम करणाऱ्या सल्लागारांची संख्या अगदीच बोटावर मोजण्याएवढी आहे. त्यामुळे सल्लागार नियुक्त झाल्यानंतरच पुढील निविदा काढल्या जातील. विकासकामांसाठी शासकीय पातळीवर नियुक्त झाली समिती

विकासकामांसाठी शासकीय पातळीवर समिती स्थापन करण्यात आली आहे.  अध्यक्षपदी पालकमंत्री वर्षा गायकवाड तर सदस्य सचिव म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, आ. तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजेश नवघरे, पोलिस अधीक्षक, जि.प. सीईओ, सा.बां.  चे अधीक्षक अभियंता, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, सदस्य नर्सी नामदेव संस्थान व सदस्य गुरुद्वारा समितीच्या एका सदस्याचा समावेश आहे. 

बातम्या आणखी आहेत...