Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | Saint Tukaram Maharaj Motivational Story Marathi Stories Life Management, How to Get Success,

जेव्हा संत तुकारामांनी आपल्या एका क्रोधी शिष्याला म्हटले की, 7 दिवसांत तुझा मृत्यू होईल, तेव्हा तो खूप उदास झाला, 7 दिवस त्या शिष्याने काय केले?

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 07, 2018, 12:05 AM IST

स्वत:ला बदलण्यासाठी आपल्याकडे फक्त 7 दिवसच आहेत, आठवा दिवस तर अस्तित्वातच नाही

 • Saint Tukaram Maharaj Motivational Story Marathi Stories Life Management, How to Get Success,

  रिलिजन डेस्क - एकदा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते. तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला- महाराज, तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागतात, तुम्ही ना कुणावर चिडतात किंवा कुणाचे वाईट चिंतित नाहीत. याचे रहस्य काय आहे?

  महाराज म्हणाले- मला माझ्या रहस्यांबद्दल तर माहिती नाही, पण मला तुझे रहस्य तर माहिती आहे. शिष्याने आश्चर्याने विचारले- माझे रहस्य काय आहे महाराज? यावर तुकाराम महाराज दु:खी होत म्हणाले- 7 दिवसांत तुझा मृत्यू होणार आहे. गुरूच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन निघून गेला.

  यानंतर शिष्याच्या स्वभावात एकदम बदल झाला. तो सर्वांशी प्रेमाने भेटायचा, कुणावरच क्रोध करत नव्हता. आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालवू लागला. आतापर्यंत ज्यांच्या-ज्यांच्याशी तो वाईट वागला, अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली.

  7 दिवसांनंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला, तेव्हा महाराज म्हणाले- तुझे मागचे 7 दिवस कसे गेल? तू आधीसारखाच लोकांवर नाराज झाला, त्यांना अपशब्द बोलला? की एखाद्यावर रागावला?

  शिष्य म्हणाला- बिलकुल नाही. माझ्याजवळ आयुष्यातील फक्त 7 दिवस होते, मी ते व्यर्थ गोष्टींमध्ये कसे घालवू शकलो असतो? मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि ज्यांना दु:ख दिले, त्यांची माफीही मागितली.


  संत तुकाराम स्मित करत म्हणाले- बस्स.. हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे. मी माहितीये की, मी कधीही मरू शकतो. यामुळेच मी प्रत्येकाशी प्रेमाने, सौजन्याने वागतो. हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे. शिष्य समजले की, महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले होते.

  लाइफ मॅनेजमेंट
  बहुतांश व्यक्ती अशा असतात, ज्या एखाद्या व्यसनाची शिकार होतात. त्यांना वाटते की, अमुक दिवशी आपण हे व्यसन सोडू, पण असे करू शकत नाहीत. असे करता-करता त्यांचे आयुष्य निघून जाते. जर आपल्याला स्वत:मध्ये बदल घडवायचा असेल, तर सुरुवात आजपासूनच करावी. कारण भगवंताने तर फक्त 7 दिवसांचीच निर्मिती केली आहे. आठवा दिवस अस्तित्वातच नाही.

Trending