आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • 'Saira...' Fame Chiranjeevi Said, "He Also Don't Like The Action, In Which The Hero Pierces The Bullet With Teeth"

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सैरा...' फेम चिरंजीवी म्हणाले - 'असे अॅक्शन आवडत नाही, ज्यामध्ये हीरो दातांनी गोळीचे तुकडे तुकडे करतो'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अशातच साउथचे मेगास्टार चिरंजीवी यांचा चित्रपट 'सैरा नरसिम्हा रेड्डी' रिलीज झाला. चिरंजीवी यांचे म्हणणे आहे की, आज स्टार्स अॅक्शन चित्रपटाची परिभाषा बदलत आहेत. या विशेष मुलाखतीत त्यांच्या अँटी ग्रॅव्हिटी अॅक्शन आणि रीजनल चित्रपटांबद्दल चर्चा झाली. या बातचितीमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांनाही असे अॅक्शन आवडत नाही. ज्यामध्ये हीरो दातांनी गोळीचे दोन तुकडे करतो. ते 'सैरा...' चित्रपटाद्वारे परतले, यामागचे कारण त्यांनी आम्हाला सांगितले.  

'बच्चन साहेब रिअल लाइफमध्येही माझे मेंटर आहेत.'
चिरंजीवी म्हणतात, 'नॉर्थ असो किंवा साउथ, प्रत्येक ठिकाणी अनसंग हीरोज पॉप्युलर असतात. सामान्य लोकांशी आपण सहज कनेक्ट करतो. 'सैरा नरसिम्हा रेड्डी' सारखे पात्र मास आणि क्लास दोन्हीप्रकारच्या ऑडियंसला वेड लावते. या चित्रपटाने मी कमबॅक केला. असे करण्याचे आणखी एक कारण होते. ते हे की, स्वतः बच्चन साहेब एकदा रिक्वेस्ट केल्यावर चित्रपटात माझे गुरु बनण्यासाठी तयार झाले. ते रिअल लाइफमध्येही माझ्या मेंटरसारखे आहे. माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये मी त्यांचे चित्रपट पाहायचो. त्यांच्या 'जंजीर' आणि 'दीवार' नंतर मीदेखील तेव्हाच्या काळात 'प्रतिबंध' सारख्या हिंदी चित्रपटात कॉप बनलो आणि या चित्रपटाने चांगला बिजनेस केला. 

'साउथमध्येही अँटी ग्रॅव्हीटीचा काळ गेला आहे'
साउथच्या चित्रपटांबद्दल नेहमी असे बोलले जाते की, तेथील चित्रपटांमध्ये अँटी ग्रॅव्हिटी अॅक्शन असते. म्हणजे एक बुक्का मारला की, एक गुंड आणि त्याचे वीस एक साथीदार हवेत उडतात. आता असे नाहीये. तिथेदेखील अॅक्शन खूप रिअल दाखवले जात आहे. हो, जसे सुपरहीरोचे जे चित्रपट असतात. तिथे नक्की अँटी ग्रॅव्हिटी अॅक्शन पाहायला मिळते. ते तर हॉलिवूडच्या चित्रपटातही होते. यामध्ये काहीही चुकीचे नाही, जर तुम्ही तुमच्या अॅएक्शनने लोकांना कन्विंस केले. प्रेक्षकांना रोमांचित वाटते, जेव्हा स्लो मोशनमध्ये गुंडांना लाथा आणि बुक्क्यांनी उडवले जाते. 

'आताचे स्टार्स अॅक्शन चित्रपटांची व्याख्या बदलत आहे'
आताचे स्टार्स अॅक्शन चित्रपटांची व्याख्या बदलत आहेत. ते कधी कधी लॉजिक बाजूला ठेवतात, पण सीन एकदम इलॉजिकल होईल, एवढे नाही. अॅक्शन सीन चेष्टा बनावे, असे तर कुठे होत नाही. बॉलिवूडबद्दल बोलायचे तर येथेदेखील अँटी ग्रॅव्हिटी अॅक्शन करावे लागते. जसे 'क्रिश' चित्रपटात होते. 

'बाहुबली' नंतर रीजनल चित्रपटांच्या अपीलमध्ये विस्तार... 
'बाहुबली' नंतर रीजनल चित्रपटांच्या अपीलमध्ये विशेष विस्तार झाला आहे. याचे अनेक फायदे झाले. तिथून खूप मोठ्या प्रमाणात स्टार्स हिंदी चित्रपटांमध्येदेखील येत आहेत. 'बाहुबली' ने बॉर्डर लाइन ब्लर केली आहे. 'केजीएफ' ला खूप यश मिळाले. 'अर्जुन रेड्डी' च्या हिंदी रीमेकने इतिहास रचला.  आता नॉर्थ की साउथ सब्जेक्ट असे अंतर उरलेले नाही. 

'गांधीजींचे मूल्य फॉलो केले.'
इतर देशवासियांप्रमाणे मीदेखील गांधीजीचा सन्मान करतो. त्यांनी जो सत्य आणि अहिंसेचा मार्ग दाखवला होता, त्याची काहीच तुलना नाही. हे आपल्याला स्वीकारावे लागेल की, आयुष्यात शांतीचा मार्ग त्यांनी सांगितलेल्या मार्गाने प्रशस्त केला जाऊ शकतो. आजदेखील जगात शांततेची गरज आहे. तेव्हा स्वातंत्र्य खूप गरजेचे होते. आताच्या पिढीला चांगल्या वातावरणात राहण्याचा हक्क मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनाच पाऊल उचलण्याची गरज आहे. 

बातम्या आणखी आहेत...