आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सैरा नरसिम्हा रेड्डी' ने 'वॉर' ला पछाडले, पहिल्याच दिवशी भारतात कमवले 69 कोटी 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बुधवारी 2 ऑक्टोबरला रिलीज झालेला चित्रपट 'सैरा नरसिम्हा रेड्डी' ने पहिल्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. ट्रेड एनालिस्ट रमेश बाला आणि गिरीश जोहर यांच्या ट्वीटनुसार, जगभरात चित्रपटाने पहिल्या दिवशी 82 कोटी कमवले. भारतात या चित्रपटाने 69 कोटींची कमाई करत आपल्या सोबत रिलीज झालेल्या 'वॉर' ला मागे टाकले.  

सुरेंद्र रेड्डीच्या डायरेक्शनमध्ये बनलेल्या चिरंजीवी आणि अमिताभ बच्चन स्टारर 'सैरा...' ने आंध्र प्रदेश/निजाममध्ये 53 कोटी, कर्नाटकमध्ये 11 कोटी, तामिळनाडू-केरलमध्ये 2 कोटी आणि भारताच्या बाकी भागांमधून 3 कोटींची कमाई केली. तसेच सिद्धार्थ आनंदकन्या दिग्दर्शनात बनलेल्या ऋतिक रोशन आणि टायगर श्रॉफ स्टारर 'वॉर' च्या हिंदी व्हर्जनने 51.60 कोटी कमवले आणि याच्या तमिळ - तेलगु व्हर्जनचे कलेक्शन 1.75 कोटी होते.  

'सैरा...' नाही मोडू शकला साउथच्या 4 चित्रपटांचा रेकॉर्ड... 
गिरीश जोहरच्या ट्वीटनुसार, 'सैरा...' वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर 4 साउथ इंडियन चित्रपटांचा रेकॉर्ड मोडण्यात अयशस्वी ठरला. हा पाचवा सर्वात मोठा ओपनर ठरला. या लिस्टमध्ये टॉपवर 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' आहे, ज्याने जगभरात पहिल्या दिवशी 214 कोटींची कमाई केली होती.  

वर्ल्डवाइड टॉप 10 सर्वात मोठे ओपनर साउथ इंडियन चित्रपट...  
1    बाहुबली 2 : द कन्क्लूजन    214 कोटी रुपये 
2    साहो    127 कोटी रुपये 
3    2.O    94 कोटी रुपये
4    काबाली    88 कोटी रुपये
5    सैरा नरसिम्हा रेड्डी    82 कोटी रुपये 
6    बाहुबली : द बिगिनिंग    73 कोटी रुपये
7    सरकार    67 कोटी रुपये
8    अग्न्याथावासी    61 कोटी रुपये
9    अरविंद समेता वीरा राघव    58 कोटी रुपये
10  भारत अने नेनू     54 कोटी रुपये