आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मराठीत कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू ?' असा प्रश्न विचारणाऱ्या आर्चीला इंग्रजीमध्ये मिळाले 'एवढे' मार्क... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : 'सैराट' चित्रपटातून सर्वांचे मन जिंकणाऱ्या आर्चीने यावर्षी परीक्षेत चांगले गुणही मिळवले आहेत. अभिनेत्री रिंकू राजगुरूने यावर्षी बारावीची परीक्षा दिली होती. आजच बारावीचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत रिंकूला 82 टक्के गुण मिळाले आहेत. रिंकूने बारावीची परीक्षा टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून दिली होती.

 

बारावीच्या सर्वच विषयात तिला चांगले गुण आले आहेत. यामध्ये इंग्रजी - 54, मराठी- 86, इतिहास- 86, भूगोल- 98, पॉलिटिकल सायन्स- 83, इकॉनॉमिक्स - 77, पर्यावरण- 49 असे एकूण 533 गुण तिला मिळाले आहेत. तिने यापूर्वी दहावीची परीक्षा सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेच्या केंद्रातून दिली होती. या परीक्षेत ती 66 टक्क्यांनी उत्तीर्ण झाली होती. सर्व विषयात चांगले गुण मिळवणारी अरची इंग्रजीमध्ये मात्र मागे राहिली. 

 

यंदाही मुलींनी मारली बाजी...

निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे, विभागीय मंडळातून मुलींचा निकाल 90.25 टक्के आहे तर मुलांचा निकाल 82.40 टक्के आहे. यावर्षी मुलींच्या निकालाची टक्केवारी 7.85 टक्क्यांनी वाढली आहे. मुंबई , पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांपैकी कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजेच 93.23 टक्के एवढा लागला आहे. तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजेच 82.81 टक्के एवढा लागला आहे.

बातम्या आणखी आहेत...