Home | Bollywood | Marathi Cinekatta | Saiyami Kher Learn Marathi Language From Her Co Star Siddharth Jadhav

सैयामी खेरने घेतले सिद्धार्थ जाधव कडून ग्रामीण भाषेचे धडे, रितेश देशमुखच्या 'माऊली'तून करतेय मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 04, 2018, 03:29 PM IST

सिद्धार्थने सैयामीला भाषेतील प्रत्येक लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्या.

  • Saiyami Kher Learn Marathi Language From Her Co Star Siddharth Jadhav

    अभिनेत्री सैयामी खेरने हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरांच्या 'मिर्जियाँ' या चित्रपटातून मधून धमाकेदार पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर सैयामी आता अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी "माऊली" या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

    माऊलीच्या माध्यमातून सैयामी पहिल्यांदाच रितेशबरोबर स्क्रीन स्पेस शेयर करत असून, तिने तिच्या या भूमिकेसाठी भरपूर मेहनत घेतली आहे. सैयामी मराठी उत्तम बोलते पण माऊली चित्रपटासाठी तिला ग्रामीण लहजा हवा होता आणि हा लहजा सैयामीला शिकवला तिच्या सहअभिनेत्याने म्हणजेच सर्वांचा फेवरेट सिद्धार्थ जाधवने. दोघांनाही क्रीडा आणि विविध भाषा शिकण्याची आवड असल्याने त्यांची सेटवर चांगली गट्टी जमली. शूटिंगच्या फावल्या वेळेत सिद्धार्थ आणि सैयामीला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांची भाषा आणि चित्रपटामध्ये वापरण्यात येणाऱ्या उच्चरणावर ते काम करत होते. सिद्धार्थने सैयामीला भाषेतील प्रत्येक लहान लहान गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांची हीच मेहनत चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही दिसून येतेय.

Trending