आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Https: Www.bhaskar.com News Sajad gharibi to fight martyn ford in mma 5985710.html?sld_seq=1

आपसात लढणार जगातील सर्वात शक्तीशाली मनुष्य; एकाचे शरीर हल्कसारखे तर दुसराही भीमकाय...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराण- लवकरच जगातील सर्वात खतरनाक मनुष्यांची फाइट होणार आहे. इरानमधील रिअल लाइफ हल्क साजाद गारीबी  आणि जगप्रसिद्ध बॉडीबिल्डर मार्टिन फोर्ड यांच्यात ही फाइट होणार आहे. एमएमएमधील एका मॅचमध्ये या दोघांची फाइट होणार असुन या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात शक्तीशाली मनुष्य अशी ओळख असलेल्या या बॉडीबिल्डर्सविषयी सांगणार आहोत...

 

'द हल्क' साजाद गारीबी

जगात उंचातील उंच मनुष्य तुम्ही पाहिले असतील परंतु साजाद गारीबच्या उंचीसोबत त्याचे शरीरही धष्टपुष्ट आहे. त्याचे शरीर भीमकाय असल्याने कारही त्याच्यासमोर छोटी दिसते. 26 वर्षीय साजादच्या भीमकाय शरीरामुळे लोक त्याची कॉमिक्स कॅरेक्टर 'द हल्क'सोबत तुलना करतात.

 

फिरण्यासाठी बनवून घेतला मोठा ट्रक

साजाद सध्या सोशल मीडियावर एक सिलेब्रिटी झाला असुन त्याला इरानिअन हल्क समजले जाते. साजाद लहानपणापासुनच धष्टपुष्ट होता. याच गोष्टीचा फायदा घेऊन त्याने वेट लिफ्टिंग सुरू केली. यामुळे त्याचे शरीर हल्कसारखे भीमकाय झाले. परंतु अशा शरीरामुळे साजादला दैनंदीन जिवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्याला कारमध्ये बसताना खुपच त्रास होतो. मेहनत करुन तो कारमध्ये बसला तरीही बाहेर निघण्यासाठी त्याला तासनतास प्रयत्न करावे लागतात. यावर उपाय म्हणुन त्याने स्वत:साठी एक ट्रक तयार करुन घेतला.

साजाद सांगतो की, वेटलिफ्टिंग ही एकच गोष्ट त्याच्यासाठी सर्वकाही आहे. साजादचे धिप्पाड शरीर पाहुन अनेक वेळा लोक त्याला घाबरतात. साजादचे वजन 180 किलो असुन मीडियाच्या एका रिपोर्टनुसार साजादने काही काळापुर्वी इरान आर्मीमध्ये भरती झाला आहे.

 

मार्टीन फोर्ड, समोर पाहुन घाबरतात लोक

इरानियन हल्कनंतर मार्टीन फोर्ड हा जगातील सर्वात खतरनाक मनुष्य आहे. मार्टीन ची उंची 7 फूट आणि वजन 145kg आहे. मार्टीन ला मसल माउंटेन, नाइटमेअर आणि मॉन्स्टर नावाने देखील ओळखले जाते. इंस्टाग्रामवर मार्टीनचे लाखो चाहते आहे. परंतु हे चाहते मार्टीनच्या प्रसिद्धीमुळे नसून त्याच्या बॉडी ट्रांसफॉर्मेशनमुळे आहे. अनेक लोक मार्टीनपासुन प्रेरीत होतात. मार्टीन आता 35 वर्षांचे असुन वयाच्या 20 व्या वर्षी ते एकदम बारीक फायटर होते.

बातम्या आणखी आहेत...