आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sajid Khan Stuck In Harassment Case Now His Nephew And Farah Khan 10 Old Son Czar Takes Care Of His Naani

इमोशनल : सेक्शुअल हरॅसमेंटमध्ये अडकलेल्या साजिद खानच्या आईची काळजी घेतोय त्याचा 10 वर्षांचा भाचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानचा भाऊ साजिद खानवर लैंगिक छळाचा आरोप लागला आहे. महिला पत्रकार करिश्मा उपाध्याय, अभिनेत्री सलोनी चोप्रा या दोघींनी साजिद खानवर गंभीर आरोप केले आहेत. आपल्या ट्विटर पोस्टद्वारे त्यांनी साजिद खानची विकृती आणि महिलांप्रती असलेले त्याचे असभ्य वर्तन जगासमोर आणले होते. त्यानंतर फराह खानने ट्विट करत साजिदच्या वर्तनावर जाहीर टीका केली आहे. जे काही आरोप सुरू आहेत त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांना खूपच दु:ख झाले आहे. माझे कुटुंब मानसिक धक्क्यातून जात आहे. जर माझ्या भावाने अशा प्रकारे असभ्य वर्तन केले असेल तर त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. माझ्या भावाच्या कोणत्याही कृतीचे मी समर्थन करत नाही. मी त्या प्रत्येक महिलेच्या पाठीशी उभी आहे.

 

दरम्यान फराह खानने एक भावूक करणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोत फराह खानचा मुलगा आणि साजिद खानचा दहा वर्षांचा भाचा त्याची आजी (साजिद-फराहची आई) मेनका खान यांची काळजी घेताना दिसतोय. फराहचा मुलगा जार त्याच्या म्हाता-या आजीची देखभाल करतो आणि दररोज त्यांना जेवू घालतो, असे फराहने सांगितले आहे. जारने त्याच्या आजीला त्याची खोलीही दिली आहे. 

 

जेव्हा फराहने आणले होते आईसाठी महागडे कॉन्टॅक्ट लेन्स... 

- फराहची आई आणि स्क्रिप्ट रायटर हनी ईराणी यांची बहीण मेनका त्यांच्या बिनधास्त बोलसाठी ओळखल्या जातात. एका मुलाखतीत त्यांनी मुलगी फराहविषयी सांगितले होते, "ती कायम आपल्या कुटुंबाची काळजी घेते. जर कुटुंबीयांना एखाद्या वस्तूची गरज असेल तर स्वतःच्या गरजा बाजुला सारुन कुटुंबीयांच्या गरजा पूर्ण करते."

 

- मेनका यांनी पुढे सांगितले, "एक काळ असा होता, जेव्हा महागडे कॉन्टॅक्ट लेन्स घ्यायची माझी इच्छा होती. त्याकाळात त्याची किंमत 800 रुपये होती. आमच्या परिस्थितीपुढे ही किंमत फारच जास्त होती. त्यावेळी फराहने घरोघरी जाऊन एका ब्रॅण्डचे तेल विकले, त्याचा सर्वे केला आणि त्यातून मिळालेल्या पैशांतून 800 रुपयांत माझ्यासाठी ते कॉन्टॅक्ट लेन्स खरीदे केले होते." 


- फराहचे वडील कामरान खान फिल्ममेकर होते. फराहची आई मेनका ईराणी या स्क्रिप्ट रायटर हनी ईराणी यांची बहीण आहे. फरहान आणि झोया अख्तर हे फराहचे मावस बहीणभाऊ आहेत. 

 

9 वर्षांनी लहान आहे फराहचे पती...
- फराहने 9 डिसेंबर 2004 रोजी फिल्म एडिटर शिरीष कुंदरसोबत लव्ह मॅरेज केले होते. शिरीष फराहपेक्षा वयाने नऊ वर्षांनी लहान आहे. या दाम्पत्याला आन्या, दीवा या दोन मुली आणि जार हा एक मुलगा आहे. या तिळ्या मुलांचा जन्म 2008 मध्ये झाला. 


- फराहच्या लग्नात शाहरुख खान, गौरी खान, अभिषेक बच्चन आणि हृतिक रोशन सहभागी झाले होते. तिच्या संगीत सेरेमनीत अभिषेक बच्चन, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा करण जोहर, शाहरुख-गौरी, हृतिक रोशन, सुझान यांनी धमाल डान्स केला होता.  

बातम्या आणखी आहेत...