Home | Maharashtra | Western Maharashtra | Kolhapur | Sakal Maratha Samaj Demands Culpable homicide Case Against CM on Maratha Suicides

मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; सकल मराठा समाजाची Press Conference

प्रतिनिधी | Update - Aug 05, 2018, 05:29 PM IST

आरक्षणासाठी बळी गेलेल्या कणेरीवाडीच्या विनायक गुदगेच्या मृत्यू प्रकरणी सकल मराठा समाजाने रविवारी पत्रकार परिषद घेतली.

  • Sakal Maratha Samaj Demands Culpable homicide Case Against CM on Maratha Suicides
    कोल्हापूर - आरक्षणासाठी बळी गेलेल्या कणेरीवाडीच्या विनायक गुदगेच्या मृत्यू प्रकरणी सकल मराठा समाजाने रविवारी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये आतापर्यंत मराठा आंदोलनात झालेल्या आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे. यासह, सोमवारी 6 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील 13 नाल्यांच्या पाण्याने शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्यास दिवसभर अभिषेक घातले जाणार आहे. तसेच 15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करू देणार नाही असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले आहे.

Trending