आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साक्षीचा खुलासा: या व्यक्तीमुळे आज एकत्रित आहेत साक्षी-धोनी; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने 18 नोव्हेंबर रोजी मुंबईत आपल्या पत्नी साक्षीचा 30 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. या ग्रँड सेलिब्रेशनमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. परंतु, साक्षीने आता त्याच वाढदिवसाचा एक फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली, जी सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये आपण आणि धोनी आज एकत्रित आहोत यामागे एका व्यक्तीचा हात आहे असा खुलासा तिने केला. सोबतच, त्या व्यक्तीचा फोटो शेअर करताना त्याचे आभार देखील मानले. 


साक्षीच्या पोस्टने उघडले रहस्य...
- साक्षीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नुकताच वाढदिवसाच्या पार्टीचा आणखी एक फोटो शेअर केला. त्यामध्ये साक्षी क्रिकेट रॉबिन उथप्पा आणि त्याची पत्नी शीतलसोबत दिसून येते. फोटो असेर करताना तिने रॉबिन उथप्पाला धन्यवाद म्हटले आहे. 
- कॅप्शनमध्ये साक्षीने लिहिले, "मी आणि माही आज एकत्रित आहोत त्याबद्दल या व्यक्तीचे खूप-खूप आभार... रॉबी आणि शीतलसोबतची भेट शानदार ठरली."
- ही गोष्ट पहिल्यांदाच समोर आली की साक्षी आणि धोनी यांना एकत्रित आणण्यात रॉबिन उथप्पाची मोठी भूमिका आहे. रॉबिन 2007 मध्ये भारतीय टीमचा सदस्य होता. तेव्हाच धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 

बातम्या आणखी आहेत...