आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; दिवाळी गेली अंधारात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर- आदिवासी विकास विभागाच्या नंदुरबार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत नंदुरबार, नवापूर, शहादा तालुक्यातील अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील कार्यरत हजारो कर्मचाऱ्यांचे वेतन वेळवर होत नसल्याने कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. 
नंदुरबार जिल्ह्यातील अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेतर मिळून जवळपास हजारो नियमित कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या 1 तारखेला बँक खात्यात जमा होणे बंधनकारक आहे; परंतु नंदुरबार जिल्ह्यातील आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबर महिन्यांचे वेतन दिवाळी पुर्वी देणार होते.परंतू महिना संपवून देखील पगार झाला नाही. ऑक्टोबर महिना उलटून 6 दिवस झाले असून वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना गृहकर्ज, विमा हप्ते, मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद व शासकीय आश्रम शाळा खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होते. त्यामुळे नंदुरबार नवापूर शहादा तालुक्यातील अनुदानित आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासाठी कार्यालयाकडून चौकशी करुन कर्मचाऱ्यांना आर्थिक विंवचनेपासून दिलासा द्यावा, अशी विधायक मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.आदिवासी विकास एकात्मिक प्रकल्प कार्यालयातील नवनियुक्त प्रकल्पाधिकारी यांना उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे. 

1 तारखेला पगार द्यावा- शासन आदेश

आदिवासी विकास विभागाच्या 28 डिसेंबर 2018 च्या परिपत्रकात म्हणाले आहे की, अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे 'आश्रमशालार्थ' वेतन प्रणाली व्दारे अदा करण्याचे आदेश आहेत. दरमहा 1 , आश्रमशालार्थ प्रणाली अदा न झाल्यास संबंधीत प्रकल्पधिकारी तसेच संबंधित मुख्याध्यापक यांना जबाबदार धरण्यात येऊन दंडात्मक व प्रशासकीय कार्यवाही करण्याबाबत शासन निर्णय असताना वेळेवर पगार का होत नाही यावर सवाल उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...