आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकचे कंटेनर्स विक्री, वापरास तूर्त परवानगी; उत्पादक, विक्रेते व वापरकर्त्यांना दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ३०० मायक्रॉनवरील जाडीच्या कंटेनर्स, ट्रेचे उत्पादन, वाहतूक, साठवणूक, विक्री आणि निर्यात इत्यादीसाठी संबंधितांवर पुढील आदेशापर्यंत कोणतीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महापालिकेला दिले. त्यामुळे उत्पादक, विक्रेते व  वापरकर्त्यांना दिलासा मिळाला आहे.   


या निर्देशाचा लाभ मिळवण्यासाठी संबंधितांना त्यांच्या बिल व पावतीवर, ‘कंटेनर्स-ट्रे ३०० मायक्रॉनवर जाडीचे असून ग्राहकांची इच्छा असल्यास ते परत घेतले जातील,’ अशी सूचना छापावी लागणार आहे. या अटीचे पालन करणाऱ्यांनाच कारवाईपासून संरक्षण मिळेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 
सरकारला नोटीस
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी व न्या. झेड. ए. हक यांनी राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नागपूर महापालिका आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांना नोटिसा बजावून ३१ आॅगस्टपर्यंत याबाबत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.

बातम्या आणखी आहेत...