आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव जिल्ह्यात वनजमिनींचे बोगस उतारे करुन परस्पर विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- भुसावळ आणि जळगाव तालुक्यातील २ हजार २८८ एकर वनजमीनींचे बनावट ७/१२ उतारे तयार करुन परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज असून यात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी चाैकशीसाठी अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन करण्यात आली आहे.

 

या समितीनेे केलेल्या चौकशीत वनजमिनींची परस्पर विक्री करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज समितीच्या अध्यक्षांनी व्यक्त केला. निवडक गटांच्या केलेल्या पडताळणीत ही जमीन वनविभागाच्याच नावावर असल्याचेही स्पष्ट झाले. कंडारी,उमाळा आणि भागपूर येथील या परिसरातील या जमिनी असून यामागे मोठे रॅकेट असल्याचा संशय आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. 


तलाठ्यांचे दप्तर घेणार ताब्यात 
वनजमिनी परस्पर विक्री प्रकरणाच्या चाैकशीसाठी कंडारी, उमाळा व भागपूर येथील तलाठ्यांचे दप्तर अपर जिल्हाधिकारी ताब्यात घेणार आहेत. या प्रकरणात तत्कालीन तलाठी सहभागी असल्याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. सन २०१३ मध्ये तत्कालीन तलाठी बहादुरे हे हाेते. त्यांच्यानंतर तीन तलाठी बदलून गेेले आहेत. विद्यमान तलाठ्यांनी या प्रकाराबाबत माहिती नसल्याचे अपर िजल्हाधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...