आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद- औरंगाबाद येथील प्रसिद्ध छायाचित्रकार किशोर निकम यांचे एक छायाचित्र नुकतेच लंडन येथील जॉनएलेज स्लेव या पर्यटक रसिकाने साडेतीन लाख रुपयांत विकत घेतले आहे.औरंगाबादच्या तापडिया नाट्यगृहात टिपलेले अस्सल भारतीय नृत्याविष्काराचे हे छायाचित्र आहे.
निकम हे २० वर्षांपासून औरंगाबाद शहरात मुक्त छायाचित्रकार म्हणून काम करतात. छायाचित्रणात आगळेवेगळे प्रयोग करणे हा त्यांचा छंद आहे. त्यांनी कल्पकतेने काढलेल्या वेगळ्या छायाचित्रांचे प्रदर्शन काही दिवसांपूर्वी मुंबईत भरवले होते. यात त्यांनी हा काढलेला नृत्याविष्काराचा फोटो होता. किशोर निकम यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी हा फोटो तापडिया नाट्यगृहात टिपलेला हा फाेटाे आहे. त्याचे प्रदर्शन मी काही दिवसांपूर्वी मुंबईत भरवले होते. तेथे जॉन हे लंडनचे पर्यटक आले होते. त्यांनी माझा पत्ता, ईमेल घेतला. तेथे गेल्यावर त्याने तो फोटो ऑनलाइन पद्धतीने कॉपीराइटसह मागवला.
काय अाहे या फोटोत
या फोटोचे वैशिट्य सांगताना किशोर निकम म्हणाले की, हा फाेटाे सोलो नृत्याचा आहे. भरतनाट्यम प्रकारातील ही भावमुद्रा आहे. पण ती वेगळ्या पद्धतीने टिपली आहे. यात कॅमेराची शटर स्पीड, अॅपरचर यांची गती नियंत्रित करून तो क्लिक केला आहे. लंडनच्या रसिकाने घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.