आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदी यांना मिळालेल्या 1800 वस्तूंची लिलावात विक्री; आठवडाभर सुरू होती लिलाव प्रक्रिया 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू व स्मृतिचिन्हांचा आठवडाभर सुरू असलेला लिलाव शनिवारी संपला. त्यात १८०० वस्तूंची यशस्वीरीत्या बोली लावण्यात आली. या वस्तूंच्या लिलावातून मिळणारी रक्कम नमामि गंगे प्रकल्पासाठी दिली जाईल. 

 

दोन टप्प्यांतील या लिलावास देशभरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात दोन दिवसांपर्यंत भेटवस्तूंची बोली लावण्यात आली. यानंतर अन्य भेटी तसेच वस्तूंची ऑनलाइन विक्री करण्यात आली. यादरम्यान १८०० वस्तूंची विक्री झाली. लिलावात विशेषत: हस्तकलेतून तयार केलेली लाकडी बाइक ५ लाख रुपयांत तर रेल्वे प्लॅटफॉर्मवर पंतप्रधान मोदी यांना दाखवणाऱ्या चित्रास तेवढीच रक्कम मिळाली. 

 

ऑनलाइन लिलावात भगवान शिवाची मूर्ती १० लाख रुपयांत विकली. लाकडी अशोक स्तंभ १३ लाख रुपयांत व आसामचा पारंपरिक ट्रे, स्टँडसह १२ लाख रुपयांत विकला. अमृतसरमध्ये एसजीपीसीकडून मिळालेेले प्रतीक चिन्ह डिव्हिनिटी' १० लाख १ हजार रुपयांत विकले. गौतम बुद्धांची मूर्ती ७ लाख रुपयांत व नेपाळचे माजी पंतप्रधान सुशील कोईराला यांनी भेट दिलेला तांब्याचा सिंह ५ लाख २० हजार रुपयांत विकला. चांदीचा एक कलश ६ लाख रुपयांत विकला. छत्रपती शिवाजी महाराजांचा प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेला अर्धाकृती पुतळा २२ हजार रुपयांत विकला. या पुतळ्याची मूळ किंमत केवळ एक हजार रुपये होती. 

 

मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मिळालेल्या भेटवस्तूंचाही लिलाव केला होता. यात मिळालेली रक्कम मुलींच्या शिक्षणावर खर्च केली होती. 
 

बातम्या आणखी आहेत...