आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिसेंबरमध्ये 3% घटली प्रवासी वाहनांची विक्री; दुचाकी विक्रीत 11% वाढ : फाडा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- वर्ष २०१८ च्या अखेरच्या महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक आधारावर तीन टक्क्यांची घट झाली आहे, तर दुचाकी वाहनांची विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे. डिसेंबर २०१८ मध्ये एकूण २,०२,५८५ प्रवासी वाहनांची विक्री झाली. वर्षभरापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये २,१७,९२२ प्रवासी वाहनांची विक्री झाली होती. गेल्या महिन्यात एकूण ११.४१ लाख दुचाकी वाहनांची विक्री झाली होती. डिसेंबर २०१७ मध्ये १०.२९ लाख दुचाकी विक्री झाली होती.  

 

वाहन डीलर्सची संघटना फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर असोसिएशन (फाडा)ने दिलेल्या ताज्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. संघटनेने हे आकडे देशातील १,४३१ मधील १,०७२ आरटीओमध्ये झालेल्या वाहन नोंदणीच्या आधारावर जारी केले आहेत. संघटना आता दर महिन्याला ७ ते १० तारखेच्या दरम्यान मासिक आधारावर वाहन नोंदणीची आकडेवारी जारी करणार आहे.  

 

फाडाचे अध्यक्ष आशिष हर्षराज यांनी मंगळवारी ही आकडेवारी जारी करताना सांगितले की, जानेवारी ते मार्च २०१९ मध्ये यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. सणांच्या हंगामानंतर डिसेंबरमध्ये इंधनाच्या किमती तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आल्या होत्या. मात्र, अर्थव्यवस्थेमध्ये नगदीची कमतरता निर्माण झाल्यामुळे वाहनांची विक्री मर्यादित झाली आहे. 

फाडाच्या अध्यक्षांच्या मते, एनबीएफसीमध्ये नगदीची स्थिती कशी आहे, याचा सरळ परिणाम वाहन उद्योगाच्या विक्रीवर होतो. धोरणात्मक उपायाचा सकारात्मक परिणाम झाल्याने चालू तिमाहीमध्ये वाहन विक्रीत वाढ दिसून येईल. यादरम्यान प्रवासी वाहनांव्यतिरिक्त दुचाकी आणि व्यावसायिक वाहनांच्या विक्रीतही तेजी येण्याची अपेक्षा फाडाच्या अहवालत व्यक्त करण्यात आली आहे.

 

डीलर्सकडे दुचाकींचा अद्यापही ५५-६० दिवसांचा साठा
फाडाने दिलेल्या माहितीनुसार सणांच्या हंगामात प्रवासी वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या ५५-६० दिवसांचा साठा ठेवत होत्या. मात्र, आता यात घट करुन ३५ ते ४० दिवसांचा साठा शिल्लक आहे. जानेवारीपर्यंत हा साठा सामान्य पातळीवर येण्याची अपेक्षा आहे. मात्र, दुचाकींचा साठा अद्यापही जास्त आहे. हा ५५-६० दिवसाच्या उच्चांकावर कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...