आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sales Of Apple More Than 1 Million Crore Profit, IPhone Sales Increased One Year Later

अ‍ॅपलला विक्रमी 1 लाख कोटींपेक्षा जास्त नफा, एका वर्षानंतर आयफाेनची विक्री वाढली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काेणत्याही अमेरिकी कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात माेठा तिमाही नफा
  • आयफाेनच्या विक्रीतून 3.99 लाख काेटींचा महसूल आला
  • आयफोन-11 ची जोरदार विक्री, सर्व्हिसेस आणि विअरलेबल्समध्येही कामगिरी

​​​​​​कॅलिफाेर्निया : अमेरिकी टेक कंपनी अ‍ॅपलचा नफा ऑक्टाेबर-डिसेंबर तिमाहीत ११.४% वाढून २२२० काेटी डाॅलर(१.५८ लाख काेटी रुपये) झाला आहे. हा काेणत्याही अमेरिकी कंपनीचा आतापर्यंतचा सर्वात माेठा तिमाही नफा आहे. चार तिमाहीनंतर फ्लॅगशिप प्राॅडक्ट आयफाेनची विक्री वाढल्याने अ‍ॅपलला फायदा झाला. अ‍ॅपलचा बहुतांश महसूल आयफाेनमधून येताे. डिसेंबर तिमाहीत आयफाेनची विक्री ८% वाढून ५६०० काेटी डाॅलर(३.९९ लाख काेटी रुपये) राहिली. अ‍ॅपलचा महसूल २०१८ च्या डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत गेल्या तिमाहीत ९% वाढून ९१८० काेटी डाॅलर(६.५४ लाख काेटी रु.) राहिला. एकूण महसुलात आयफाेनचा हिस्सा ६१टक्के आहे.

आयफाेनवरील अवलंबित्व कमी करण्यावर भर

अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक म्हणाले की, गेल्या तिमाहीत आयफोन ११ ची सर्वात जास्त विक्री झाली. सर्व्हिसेस आणि व्हियरेबल्स सेगमेंटमध्येही विक्रमी महसूल मिळाला. सर्व्हिसेस आणि व्हियरेबल्स सेगमेंटमध्ये महसूल वाढणे कंपनीसाठी महत्त्वाचे कारण, गेल्या काही तिमाहीमध्ये आयफाेनच्या विक्रीत घसरण पाहता कंपनीला भविष्यात या श्रेणीकडून अपेक्षा हाेती. सर्व्हिसेस सेगमेंटमध्ये अ‍ॅपल टीव्हीप्लस अ‍ॅपल म्युझिक, आयक्लाड, अ‍ॅपल केअर आणि अन्य उत्पादनांचा समावेश आहे. या वर्षी ६० काेटी पेड सबस्क्रिप्शन अाहेत.

वृद्धी परतली, १५% महसूल तेथूनच आला

कंपनीने जानेवारी-मार्च तिमाहीत एकूण ६३ अब्ज ते ६७ अब्ज डाॅलरच्या महसुलाचा अंदाज व्यक्त केला आहे. अ‍ॅपलसाठी अमेरिकेनंतर चीन एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. डिसेंबर तिमाहीत चीनमध्ये अ‍ॅपलच्या महसुलात वाढ झाली. याआधी सतत घसरण हाेत हाेती. कंपनीच्या एकूण महसुलात चीनची हिस्सेदारी १५% राहिली. अ‍ॅपलनुसार, काेराेना विषाणू संसर्ग न वाढल्यास चीनमध्ये पुढेही कंपनीच्या वृद्धीबाबत काेणताही प्रश्न उपस्थित हाेत नाही.

विअरेबल्स सेगमेंटमध्ये 37% महसूल वृद्धी

सेगमेंट : महसूल वृद्धी
आयफोन : 8%
सर्व्हिसेस : 17%
विअरेबल्स : 37%

अ‍ॅपल वृद्धीवर भारतात भूमिका

अ‍ॅपल भारतात आयफाेन एक्सआरची निर्मिती करत आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत भारतात कंपनी आऊटलेटद्वारे थेट उत्पादन विक्री करण्याची याेजना आहे. अ‍ॅपलने वेगवेगळ्या देशांत विक्रीचे आकडे जारी केले नाहीत.

चौथ्या तिमाहीत भारतात ४१% वृद्धी : काउंटरपॉइंट रिसर्च

२०१८ अ‍ॅपलसाठी खूप चांगले नव्हते. भारतीय बाजारपेठेत तिची विक्री केवळ ४३ टक्के हेाती. मात्र, काउंटरपॉइंट रिसर्चनुसार, २०१९ च्या चौथ्या तिमाहीत कंपनीने भारतात ४१% ची वृद्धी प्राप्त केली आहे. हे देशातील प्रिमियम सेगमेंटच्या स्मार्टफोनच्या वृद्धीच्या जवळपास दुप्पट आहे. डिसेंबर तिमाहीत भारतात प्रिमियम सेगमेंट सुमारे २०☻% दराने पुढे जात आहे. आयफोन-११ आणि आयफोन एक्सआरला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात अ‍ॅपलची हिस्सेदारी २% झाली आहे. या वर्षाच्या मध्यापर्यंत भारतात कंपनीची आऊटलेटद्वारे थेट उत्पादन विक्रीची योजना आहे.