आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलच्या आयफोन एक्स-एस मॅक्सची १७५% नफ्यावर विक्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया- अॅपल या महिन्यात लाँच करण्यात आलेला आयफोन एक्स-एस-मॅक्स २५६ जीबीची १,२४९ डॉलर (८९,९२८ रुपयांत) विक्री करत आहे. वास्तविक हा फोन तयार करण्यावर कंपनीला केवळ ४५३ डॉलर (३२,६१६ रुपये) खर्च आला आहे. म्हणजेच या फोनवर अॅपल १७५ टक्के नफा कमावत आहे. 


या खर्चामध्ये फोन साठीचे सर्व सुटे भाग, त्याचे टेस्टिंग आणि असेंबलिंग यांचाही समावेश आहे. कॅनडियन संशोधन संस्था 'टेकइनसाइट्स'च्या वतीने हा दावा करण्यात आला आहे. अॅपलने मागील वर्षी आयफोन-एक्स लाँच केला होता. याला बनवण्याचा खर्च ३९५ डॉलर (२८,४७२ रु.) होता, तर याच्या २५६ जीबी मॉडेलची किंमत अॅपलने १,१४९ डॉलर (८२,७२८ रुपये) निश्चित केली होती. 


म्हणजेच बनवण्याच्या खर्चात केवळ ५० डॉलरची वाढ झाली मात्र, दरात १०० डॉलरपेक्षा जास्त वाढ करण्यात आली. आयफोन-एक्स-एस मॅक्स बनवण्यासाठी सर्वाधिक खर्च ६.५ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले बनण्यावर येतो. यावरील खर्च ९०.५० डॉलर (६,५१६ रुपये) आहे. अॅप प्रोसेसर/मोडेम ७२ डॉलर (५,१८४ रुपये) आणि कॅमेरा ४४ डॉलर (३,१६८ रुपये)चा आहे. 


आयफोन-एक्स-एस 
६४ जीबी : ९९,९०० रुपये 
२५६ जीबी : १,१४,९०० रुपये 
५१२ जीबी : १,३४,९० रुपये 


जून तिमाहीत भारतीय बाजारात आयफोनच्या भागीदारीत घट 
काउंटर पाॅइंटच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या अहवालानुसार ३०,००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या स्मार्टफोन श्रेणीमध्ये एप्रिल ते जूनमध्ये आयफोनची भागीदारी १३.६ टक्के राहिली, जी एप्रिल ते जून २०१७ मध्ये २९.६ टक्के होती. या श्रेणीमध्ये चायनीज कंपनी वनप्लस पहिल्या आणि सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. 


भारतात आयफोन-एक्स-एस मॅक्सची विक्री शुक्रवारपासून झाली सुरू 
भारतात आयफोन-एक्स-एस आणि आयफोन-एक्स-एस मॅक्सची विक्री शुक्रवारपासून सुरू झाली आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मॉडेलचे एक-एक लाख फोन मागवण्यात आले आहे. वास्तविक ७० टक्के प्री-बुकिंग आयफोन-एक्स-एस-मॅक्ससाठी झाली आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्येही याच फोनची जास्त विक्री होत आहे. या वर्षी अॅपलने आयफोन-एक्स-आर देखील लाँच केला होता. भारतात याच विक्री दिवाळीच्या सुमारे दोन आठवड्यापूर्वी २६ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याची किंमत ७६,९०० रुपयांपासून सुरू होईल.

 
ग्रे-मार्केटमध्ये कमी किंमत 
२० टक्के आयात शुल्क आणि रुपयांच्या किमतीमध्ये होत असलेल्या घसरणीमुळे भारतात आयफोनचे दर जास्त आहे. संशोधन संस्था काउंटर पाॅइंटचे असोसिएट संचालक तरुण पाठक यांनी सांगितले की, किंमत जास्त असल्याने ग्रे-मार्केटमध्ये मागणी वाढते. या बाजारात हा फोन १५ ते २० हजार रुपयांनी स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. अॅपल आयफोनवर इंटरनॅशनल वॉरंटी देतो, त्यामुळे ग्रे-बाजारातही याची चांगली मागणी असते. 


आयफोन-एक्स-एस मॅक्स 
६४ जीबी : १,०९,९०० रुपये 
२५६ जीबी : १,२४,९०० रुपये 
५१२ जीबी : १,४४,९०० रुपये 

बातम्या आणखी आहेत...