आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्ष २०१८-१९ मध्ये २.५ पट वाढली महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांची विक्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- महिंद्रा अँड महिंद्राच्या वाहनांच्या विक्रीत (ई-वाहन) मागील आर्थिक वर्षात २०१८-१९ मध्ये अडीच पट वाढ झाली आहे. कंपनीने एप्रिल २०१८ पासून मार्च २०१९ दरम्यान १०,२७६ ई-वाहनांची विक्री केली. यामध्ये सरकारी कंपनी ईईएसएलकडून ई-वाहनांसाठी दुसऱ्या टप्प्यात मिळालेल्या आॅर्डरचे महत्त्वाचे योगदान आहे. कंपनीने या आधी मागील आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये ४,०२६ ई-वाहनांची विक्री केली होती. महिंद्रा इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीमध्ये सेडान ई-वेरिटो, व्हॅन ई-सुप्रो, कॉम्पॅक्ट कार ई-२-ओ आणि तीनचाकी वाहन ट्रेयोची विक्री करत आहे. 


कंपनीने एका गुंतवणूक सादरीकरणात सांगितले की, एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (ईईएसएल) कडून दुसऱ्या टप्प्यात जी ऑर्डर मिळाली त्याची डिलिव्हरी चालू आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कायम राहील. ईईएसएलने सरकारी विभागांसाठी १०,००० इलेक्ट्रिक सेडान कारचा पुरवठा करण्यासाठी टेंडर काढले होते. एमअँडएम आणि त्यांची स्पर्धक कंपनी टाटा मोटर्सला ईईएसएलकडून ई-वाहनांचा पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली होती. ईईएसएलने पहिल्या टप्प्यातील ऑर्डर अंतर्गत ५०० ई-कार घेतल्या होत्या. यामधील १५० कारचा पुरवठा एमअँडएमने तर उर्वरित ३५० गाड्यांचा पुरवठा टाटा मोटर्सने केला होता.