बोइंगच्या भारतीय प्रमुखपदी / बोइंगच्या भारतीय प्रमुखपदी सलील गुप्ते; भारतात बोइंगचे व्यावसायिक विमान, बोइंग डिफेन्स, स्पेस, सिक्युरिटीशी संबंधित घडमोडींना वाढवण्याची जबाबदारी  

Feb 13,2019 09:16:00 AM IST

मुंबई- अमेरिकी विमान निर्माता कंपनी बोइंगने सलील गुप्ते यांची भारतातील प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. त्यांची ही नियुक्ती १८ मार्च पासून लागू होईल. ते प्रत कुमार यांची जागा घेतील, ज्यांना मागील नोव्हेंबरमध्ये कंपनीचे एफ-१५ फायटर एअरक्राफ्ट प्रकल्पाचे उपाध्यक्ष आणि प्रकल्प व्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. बोइंगने मंगळवारी ही माहिती दिली.

त्यानुसार गुप्ते बोइंग इंडियाचे अध्यक्ष म्हणून दिल्लीत काम करतील. ते सरळ बोइंग इंटरनॅशनलचे अध्यक्ष मार्क एलन यांना रिपोर्ट करतील. सध्या ते बोइंगची सहयोगी कंपनी बोइंग कॅपिटल कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. नवीन पद सांभाळल्यानंतर भारतात बोइंगचे व्यावसायिक विमान, बोइंग डिफेन्स, स्पेस, सिक्युरिटीशी संबंधित घडमोडींना वाढवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

या नियुक्तीनंतर सलील गुप्ते आता सरकार आणि बिझनेस स्टेक होल्डर्ससह बोइंगची पार्टनरशिपदेखील मॅनेज करतील. यामध्ये सुमारे २,५०० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात.

X