आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या जोडीचे नाव होते, चांगले पैसेही मिळायचे, पण अचानक सर्वकाही संपले, जावेद अख्तरपासून वेगळे होण्याचे सलमानच्या वडिलांना अजूनही आहे दुःख, म्हणाले - जोडी काय मोडली चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. फिल्म इंडस्ट्रीमध्ये सलीम खान आणि जावेद अख्तरची जोडी खुप प्रसिध्द होती. या जोडीने 'शोले', 'जंजीर', 'डॉन' पासून 'शान'सारखे जवळपास 23 चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहिले. पण ही जोडी तुटल्यानंतर इंडस्ट्रीला सर्वात मोठा धक्का पोहोचला होता. तसेतर सलीम खान याविषयी खुप कमी बोलतात, पण नुकत्याच एका चॅट शोमध्ये त्यांनी त्यांच्या करिअरच्या ब-याच गोष्टी शेअर केल्या. त्यांनी सांगितले की, आजही मला आमची जोडी तुटल्याचे दुःख आहे. 


जेव्हा जावेद म्हणाला होता, वेगळे व्हायचे आहे, तेव्हा खुप धक्का बसला होता 
चॅट शोमध्ये बोलताना सलीम म्हणाले की, 'जावेद मला म्हणाला की, वेगळे व्हायचे आहे. हे ऐकून मला खुप त्रास झाला होता. आमचे वेगळे होण्याचे काहीच कारण नव्हते. आमच्या जोडीचे नाव होते, चित्रपट हिट ठरत होते, पैसाही चांगला मिळत होता. पण एक दिवस अचानक वेगळे होण्याचा विचार करणे हे खरंच त्रासदायक होते.'

- सलीम म्हणाला - 'जे नाव उभे केले, वेळ दिला, ते एका क्षणात संपले. इंडस्ट्रीमध्ये जोडीचे नाव चांगले असल्यामुळे चांगले पैसे मिळत होते पण सर्व काही संपल्यानंतर चित्रपट फ्लॉप होऊ लागले.'

 

मुलाविषयीही बोलले 
- मुलाखतीत सलीम आपला मुलगा सलमान खानविषयीही बोलले. ते म्हणाले - 'इंडस्ट्रीमध्ये सलमान पहिला असा स्टार असेल जो छोट्या फ्लॅटमध्ये राहतो. खरंतर तो मला बरेचदा म्हणाला की, पँटाहाउस किंवा बंगला घेऊन. पण 'जंजीर'नंतर मी या अपार्टमेंटमध्ये आलो होतो. आता येथे राहण्याची सवय झाली आहे. ही जागा सोडून जाण्याची इच्छा होत नाही. माझ्यामुळे सलमानही ही जागा सोडण्यास तयार नाही.'
- सलीम यांनी सलमान तुरुंगात गेल्याच्या काळाविषयीही बोलले. ते म्हणाले - 'तो तुरुंगात होता तेव्हा मला आणि सलमाला पाणी पितानाही वाईट वाटायचे. तो तुरुंगात कसा राहत असेल याचा आम्ही विचार करायचो. सलमानला आजही खुप दुःख आहे की, त्याने त्याच्या आई वडिलांना खुप त्रास दिला.'


 

बातम्या आणखी आहेत...