आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: वयाच्या 16 व्या वर्षी लग्न करणा-या या अॅक्ट्रेसचा तीन वेळा झाला घटस्फोट, वाचा तिच्याविषयी A to Z

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अभिनयाबरोबरच पार्श्वगायन करणा-या अभिनेत्रीसुद्धा आहेत. लंडनमध्ये लहानाची मोठी झालेली पाकिस्तानी वंशाची अभिनेत्री सलमा आगा अशीच एक प्रतिभावंत अभिनेत्री आहे. आज (25 ऑक्टोबर) सलमा आगाचा 62 वा वाढदिवस आहे. 1956 मध्ये लंडनमध्ये सलमाचा जन्म झाला. 80 आणि 90च्या दशकात सलमा बॉलिवूडमध्ये कार्यरत होती. तिचा पहिला सिनेमा बी. आर. चोप्रा यांचा 'निकाह' हा होता. या सिनेमात तिने पार्श्वगायनही केले होते. या सिनेमातील 'दिल के अरमां आसुओं में बह गए...' या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

 

> अभिनेत्री आणि गायिका असलेल्या सलमा आगा हिचा जन्म एका श्रीमंत मुस्लिम कुटुंबात झाला होता. ती नऊ वर्षांची असताना तिचे संपूर्ण कुटुंब नेहमीसाठी लंडनमध्ये स्थायिक झाले होते. 

 

> सलमा किराणा घराण्याची गायिका आहे. 1930 आणि 40 च्या दशकातील बॉलिवूडचे प्रसिद्ध कलाकार जुगल किशोर मेहरा सलमा हिचे आजोबा आहेत. 

 

> सलमा हिची आई नसरीन आगा यासुद्धा एक प्रसिद्ध कलाकार होत्या. त्यांनी के. एल. सहगल यांसारख्या अभिनेत्यांबरोबर काम केले. 

 

> लंडनमध्ये स्थायिक झाल्यानंतर सलमाचे शिक्षण स्वित्झर्लंडमध्ये झाले. तिचे वडील लियाकत गुल आगा बिझनेसमन होते. 

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सलमाविषयी बरेच काही...

बातम्या आणखी आहेत...