आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढच्या वर्षी ईदला सलमान-अक्षयची होणार टक्कर, धर्मसंकटात सिनेमागृहांचे मालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : गेल्या एका दशकापासून सलमान खान ईदवर चित्रपट रिलीज करत आला आहे. त्याचा चित्रपट पाहून कोणताच स्टार त्या दिवशी आपला चित्रपट रिलीज करत नव्हता, मात्र आता यात बदल होत चालला आहे. आता पुढच्या वर्षी ईदवर सलमानसमोर अक्षय कुमार उभा राहणार आहे. सलमानचा चित्रपट राधे ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. त्याच दिवशी अक्षयनेदेखील आपल्या 'लक्ष्मी बॉम्ब'ला रिलीज करण्याची घोषणा केली आहे. या टक्करबद्दल ताऱ्यांना काही वाटत नसेल, परंतु एकल-स्क्रीनच्या प्रदर्शकांना चिंता लागली आहे. या विषयावर सलमान किंवा अक्षयच्या वतीने अद्याप बैठक झालेली नाही.


135 कोटी खर्च झाले दोन्ही चित्रपटांवर
300 कोटी रुपये कमवावे लागतील तीन दिवसात


चित्रपट - राधे 
बजेट - 85 कोटी
सलमानची फीस - 50-55 कोटी


चित्रपट - लक्ष्मी बॉम्ब
बजेट - 50 कोटी
अक्षयची फीस - १ कोटी रोज
 

३ दिवसांत कमवावे लागतील ३०० कोटी
या दोन्ही चित्रपटांची निर्मिती एकूण १३५ कोटी आहे. त्याशिवाय सलमानची फी ५० ते ५५ कोटींच्या घरात आहे. दुसरीकडे अक्षय रोजचे एक कोटी रुपये घेतो. त्यामुळे जितक्या जास्त दिवस सुट्टया असतील, तितका पैसा यातून काढता येईल.

छोट्या बजेटवर लावला जातोय पैसा
सध्या छोट्या बजेटचे चित्रपटदेखील १०० कोटींची कमाई करत आहेत. निर्मात्यांकडून चित्रपटाचे अधिकार विकत घेण्यास वितरक आणि प्रदर्शनकर्त्यांना कमी पैसे लागतो आणि त्यात त्यांना रिस्कही वाटत नाही. आता 'लक्ष्मी बॉम्ब' आणि 'राधे' साठी वितरक आणि प्रदर्शकांना यासाठी एकूण ३०० ते ३५० कोटी रुपये द्यावे लागतील.

ऐनवेळी होऊ शकतो बदल
अशी टक्कर होत असेल तर चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा ऐनवेळी बदलू शकतात. 'बाला' आणि 'उजडा चमन' च्या बाबतीतही असेच घडले होते, त्यामुळे यातही असा बदल होऊ शकतो. याचा निर्माते, प्रदर्शक आणि प्रेक्षकांना तिघांनाही फायदा होईल, पण हे घडते की नाही, हे पाहण्याजोगे ठरेल.

काय म्हणतात तज्ज्ञ
कार्निवल सिनेमा चेन प्रोग्रामिंगचे उपाध्यक्ष राहुल कुडबेट, प्रदर्शकांची चिंता व्यक्त करत सांगतात, ' या चित्रपटांमुळे प्रेक्षकांमध्ये विभागणी होईल. दोन्ही चित्रपटांमध्ये अनावश्यक तुलनादेखील केली जाईल. एकाच तारखेला एखादे मोठे कुटुंब दोन मोठे चित्रपट पाहू शकत नाही. कारण तीन लोकांचे कुटुंब जरी असले तरी त्यांना १००० ते १५०० रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यातदेखील दुसरा चित्रपट पाहणे शक्य होणार नाही.


सिंगल स्क्रीन्सची बाजू घेणारे मनोज देसाई म्हणतात, 'दोन्ही चित्रपट एकाच तारखेला आले तर मल्टिप्लेक्स अडजस्ट करून घेईल, परंतु सिंगल स्क्रीनचा मोठा तोटा होईल. तो टाळण्यासाठी लवकरच सर्वांनी मिळून बैठक घ्यायला हवी. दोन्ही चित्रपट चांगले आहेत. अक्षयने खूपच बोल्ड पाऊल उचलले आहे आणि सलमानची स्वत: ची माेठी फॅन फॉलोइंग आहे, जे ईदवर त्याचा चित्रपट पाहू इच्छित असतात.

सलमानवर राहील मोरल प्रेशर
ट्रेड तज्ञांच्या मते, सलमानवर या चित्रपटाची तारीख बदलण्याचा मोरल प्रेशरदेखील राहील. कारण नुकतीच 'इंशाअल्लाह' ची घोषणा झाली होती तेव्हा अक्षयने आपल्या 'सूर्यवंशी' चित्रपटाची तारीख बदलली होती. त्या बदल्यात सलमान 'लक्ष्मी बॉम्ब' साठी तसे करतो की नाही ते पाहण्याजोगे राहील.