आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब घरातील सलमान अली बनला इंडियन आयडॉल 10 चा विनर, फिनालेत चार स्पर्धकांवर मात देत नावी केले विजेतेपद, महागड्या कारसोबत मिळाले 25 लाख रुपये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबई- हरियाणाच्या मेवात येथील रहिवाशी असलेल्या सलमान अलीने इंडियन आयडॉलच्या दहाव्या पर्वाचा विजेतेपद आपल्या नावी केले आहे. सलमानने अंतिम फेरीत पोहोचलेल्या अंकुश भारद्वाज, नीलांजना राय आणि विभोर पाराशर यांना माते देते विनिंग ट्रॉफी जिंकली. अंकुश भारद्वाज आणि सलमान अली टॉप 10 मध्ये पोहोचले होते. सलमान विजेता ठरल्यानंतर त्याला 25 लाख रुपये प्राइज मनी आणि महागडी कार मिळाली आहे. नेहा कक्कड आणि विशाल ददलानी यांनी त्याच्या नावाची विजेता म्हणून घोषणा केली. विशेषतः नेहाने सोशल मीडियावर सलमानसोबतचा सेल्फी पोस्ट करुन त्याला शुभेच्छा दिल्या. विजेता म्हणून योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे तिने म्हटले आहे. 


गरीब कुटुंबातून आहे सलमान...
- सलमान एका गरीब कुटुंबातून आहे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्याचे बालपण गेले. या शोमुळे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले, असे तो म्हणाला. यासाठी त्याने सोनी टीव्हीचेही आभार मानले.
- सलमानने म्हणाला, "या शोने सगळ्यांना एक अतिशय चांगली व्यक्ती बनवले. जेव्हा मी या शोमध्ये आलो, तेव्हा मला कुणीही ओळखत नव्हते. आज मला प्रत्येकजण ओळखू लागला आहे. मी एका गरीब कुटुंबातून येथे आलोय."

 

फिनालेमध्ये पोहोचली होती 'झिरो'ची स्टारकास्ट
- फिनालेमध्ये 'झिरो'च्या स्टारकास्टने हजेरी लावली होती. शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांनी खास अंदाजात शोमध्ये एन्ट्री घेतली आणि हा क्षण अविस्मरणीय बनवला. 
- यावेळी शाहरुखने झिरो या चित्रपटाचे प्रमोशन केले. तो चित्रपटातील त्याच्या को-अॅक्ट्रेस कतरिना आणि अनुष्कासोबत रिक्षात बसलेला दिसला. 


- शोची परीक्षक नेहा कक्कडने यावेळी दमदार सादरीकरण केले. तर शोचे आणखी दोन परीक्षक विशाल ददलानी आणि जावेद अली यांनीही सिंगिंग परफॉर्मन्स दिला.  


- कपिल शर्माचा नवीन शो  येत्या 29 डिसेंबरपासून सुरु होतोय. या शोच्या प्रमोशनसाठी इंडियन आयडॉल फिनालेत विनोदवीर किकू शारदा सांता क्लॉजच्या रुपात अवतरला होता.  

बातम्या आणखी आहेत...