आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार पिढयांपासून लग्नामध्ये गाण्याचे कार्यक्रम करून जगते आहे सलमानची फॅमिली, गरीबी एवढी की घरात TV सुध्दा नव्हता, मुलाचा शो पाहायला दुस-यांच्या घरी जायचे सलमानचे वडील

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिंगिंग रियलिटी शो 'इंडियन आयडॉल' चा ग्रैंड फिनाले 23 डिसेंबरला झाला. शोचा विनर हरियाणाचा राहणार कंटेस्टेंट सलमान अली बनला. सलमानचे कॉम्पिटीशन फाइनलमध्ये पोहोचलेले चार कंटेस्टेंट नितिन कुमार, अंकुश भारद्वाज, नीलांजना राय आणि विभोर पाराशर यांच्यासोबत होते. या चौघांनाही मागे टाकत सलमानने विजेता ट्रॉफी आपल्या नवी करून घेतली. इंडियन आयडॉलचा विनर बनलेला सलमान खूप गरीब घरातील आहे. सलमानची फॅमिली चार पिढयांपासून लग्नात गाणे म्हणून आपले गुजराण करते.

 

सलमानचे वडील म्हणाले, मुलाच्या कर्तृत्वावर गर्व आहे.. 
सलमानचे वडील कासिम अली यांनी सांगितले, त्यांनी कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की त्यांचा मुलगा या उंचीवर पोहोचेल. कासिमने हेही सांगितले की त्यांना त्यांच्या मुलाच्या कर्तृत्वावर गर्व आहे. त्यांच्या घराची हालत इतकी वाईट होती की त्यांच्याकडे टीव्हीदेखील नव्हता. त्यामुळे ते सलमानचा शो पाहण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी जायचे. इंडियन आयडॉलचा विनर झाल्यानंतर सलमानला विनिंग अमाउंट म्हणून 25 लाख रुपये रोख आणि डेटसन कार मिळाली आहे. 

 

6 वर्षांचा असल्यापासून गातो आहे सलमान...
सलमान हरियाणाचा राहणार आहे. तेथे सलमानला मलंग म्हणून ओळखले जाते. केवळ 6 व्या वर्षांपासून गायलं सुरुवात करणाऱ्या सलमानची फॅमिली मिरासी समाजातील आहे. जे गाण्याचे कार्यक्रम करतात. सलमानने कमी वयातच लग्नांमध्ये आणि जागरणात गायला सुरुवात केली. सलमानचे वडील कासिम अलीने त्याला दिल्लीतील गायक उस्ताद इकाबल हुसैनयांच्या कडून संगीटाचे शिक्षण प्राप्त करून दिले आहे. 

 

कधी विचारही नव्हता केला 25 लाख रुपये एकत्र पाहू शकेन..
20 वर्षाच्या सलमान अलीने कधी विचारही केला नाहटा की तो एकत्र 25 लाख रुपये कधी पाहूही शकेन. जेव्हा इंडियन आयडॉल 10 चा विनर झाला तेव्हा त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले. जिंकल्यानंतर सलमान अलीने dainikbhaskar.com शी बातचीत केली. सलमानने आपले स्वप्न पूर्ण करण्याबद्दल, कुटुंबाची आर्थिक मदत करण्याबद्दल आणि फेवरेट म्यूजिशियनसोबत काम कारण्याबद्दलच्या अनेक इच्छा बोलून दाखवल्या. 

 

फायनली माझे स्वप्न पूर्ण झाले.. 
मला मनात कुठेतरी दृढ विश्वास होता की मी फायनलपर्यंत पोहोचेन पण शो जिंकणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखेच आहे. मी अशा कुटुंबातून आलो आहे ज्यांनी गेल्या 4 पिढयांपासून सिंगिंगमधेच करियर बनवले आहे. माझ्या कुटुंबातील लोक लग्न आणि जगारानामध्ये परफॉर्म करतात, नेशनल टेलीविजनवर गाणे खूप मोठी गोष्ट आहे. मी माझ्या कुटुंबाला प्राऊड फील करून दिले म्हून मी खूप खुश आहे. माझा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. 

 

जिंकलेल्या पैशातून घराचे कर्ज फेडीन..
सलमान पुढे म्हणाला, मी 9 वीपर्यंत शिकलो आहे. पुढे शिकू शकलो नाही कारण पेरेंट्सकडे पुढील शिक्षणासाठी पैसे नव्हते. मला शिक्षणाचे मतत्व ठाऊक आहे म्हणून मी आता माझे शिक्षण पूर्ण करणार आहे.  विनिंग अमाउंटमधून मी सर्वात अगोदर कर्ज फेडणारा हे जे माझ्या कुटुंबाने काही अत्यावश्यक गरजांसाठी घेतले होते. घराची अवस्था ठीक करायची आहे. त्यामुळे हे सर्व पैसे मी या गोष्टींमध्येच खर्च करू इच्छितो. या पैशांसोबत आयुष्य पुढे नेऊ इच्छितो. 

 

एआर रहमानसोबत काम करण्याची इच्छा आहे.. 
बॉलिवूडमध्ये आणि ए आर रहमानसोबत काम करण्याची माझी इच्छा आहे. मला माहित आहे हे एवढे सोपे नाही. या पैशांतीळ काही भाग मी संगीत शिक्षणावर खर्च करू इच्छितो. सलमान अलीने वरुण धवनचा चित्रपट 'सुई धागा' मध्ये गाणे गेले आहे. याव्यतिरिक्त त्याने 'चंद्रगुप्त मौर्य' या टीव्ही शोलाही आपला आवाज दिला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...