आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Alia Bhatt's Movie 'InshaAllah', Postponed, Will Not Be Released On Eid In 2020

पुढे ढकलला गेला सलमान-आलिया भट्टचा चित्रपट 'इंशाअल्लाह', 2020 मध्ये यावेळी ईदला रिलीज होणार नाही चित्रपट 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : सलमान खान आणि आलिया भट्ट स्टारर चित्रपट 'इंशाअल्लाह' ची रिलीज डेट पुढे ढकलली गेली आहे. सलमानने रविवारी रात्री ट्विटरवर ही माहिती दिली. त्याने लिहिले, "संजय लीला भन्साळींसोबतचा चित्रपट पुढे ढकलला गेला आहे. पण तरीही मी तुम्हाला ईद 2020 ला भेटणार आहे.... इंशाअल्लाह." मात्र सलमानने ना 'इंशाअल्लाह' ची नवी रिलीज डेट सांगितली ना हे सांगितले की, ईद 2020 ला तो ऑडियंसला कसे भेटणार आहे.
 

याचवर्षी जूनमध्ये केले होते स्पष्ट... 
मागच्या जूनमध्ये हे स्पष्ट केले गेले होते की, सलमान खान सुमारे 13 वर्षानंतर संजय लीला भन्साळींच्या दिग्दर्शनात काम करणार आहे आणि हा चित्रपट ईद 2020 ला रिलीज होणार आहे. दोघांनी यापूर्वी 'खामोशी : द म्यूझिकल' (1996), 'हम दिल दे चुके सनम'(1999) आणि 'सांवरिया' (2007) मध्ये एकत्र काम केले होते.  
 

'सूर्यवंशी' ची रिलीज डेट बदलावी लागली होती... 
'इंशाअल्लाह' मुळे दिग्दर्शक रोहित शेट्टीला आपला चित्रपट 'सूर्यवंशी' ची रिलीज डेट बदलावी लागली होती. ईदच्याच दिवशी 'इंशाअल्लाह' पूर्वी अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' अनाउंस झाला होता. पण सलमानच्या चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर रोहित शेट्टीने आपल्या चित्रपटाची रिलीज डेट सुमारे दोन महिने अगोदर 27 मार्च 2020 ला शिफ्ट केला होता. स्वतः सलमानने ही अनाउंसमेंट ट्विटरवर केली होती.  
 

'दबंग 3,' 'बिग बॉस 13' मध्ये व्यस्त आहे सलमान... 
सलमान खान सध्या आपला आगामी चित्रपट 'दबंग 3' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. प्रभुदेवाच्या दिग्दर्शनात आणि अरबाज खानच्या बॅनरखाली बनत असलेला हा चित्रपट 20 जुलै 2019 ला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त 'बिग बॉस' चे 13 वे सीजनदेखील सप्टेंबरमध्ये सुरु होणार आहे, ज्याचा होस्ट सलमान खानच आहे. अशातच त्याचा प्रोमोदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये सलमान स्टेशन मास्टरच्या लुकमध्ये दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...