आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Bhansali Dispute Over Profit Sharing, Superstars Demanded For A Big Share

नफ्याच्या वाटणीवरून सलमान-भन्साळीमध्ये झाला वाद, सुपरस्टारने मागितला होता मोठा वाटा  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : संजय लीला भन्साळी आणि सलमान खान आता 'इंशाअल्लाह' चित्रपटात सोबत काम करणार नाहीत. इंडस्ट्रीत जेव्हा ही बातमी पसरली तेव्हापासून बरीच अफवा पसरली आहे. सलमान स्क्रिप्टमध्ये वारंवार हस्तक्षेप करत असल्यामुळे भन्साळीला ते आवडले नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांनी चित्रपट सोडल्याची चर्चा आहे. दुसरीकडे सूत्रानुसार, सलमानला फीस आणि नफ्यात वाटा हवा होता, त्यामुळे त्यांच्यात वाद झाला. 
 

सलमान मागत होता मोठा वाटा... 
सलमान सूत्रानुसार, 'सलमान भारतात सुपरस्टार आहे. चित्रपटासाठी तो मानधन घेत नाही मात्र एकूण नफ्यात वाटा मागतो. मग ती कितीही माेठी कंपनी असो. 'इंशाअल्लाह'विषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाची निर्मिती दोघे मिळून करत होते. भन्साळीने सलमानला शंभर दिवसापेक्षा जास्त दिवस मागितले होते. त्यामुळे सलमानने नफ्यातील जास्त वाटा मागितला. त्यावर भन्साळी नाराज झाले. कारण ते स्वत: सुपरस्टार दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्या नावावरदेखील चित्रपट विकला जातो, असे त्यांना वाटते. 
 

सलमानला मिळते 100 कोटी एवढी मोठी रक्कम... 
सलमानची मार्केट व्हॅल्यू पाहिली तर तो एका दिवसाचे १ कोटीपेक्षा जास्त मानधन घेतो. त्यामुळे १०० दिवसासाठी तो १०० कोटी रुपये घेणार होता. कारण शूटिंग शंभर दिवस चालणार होती. मात्र चित्रपटाचे बजेटच १५० कोटी रुपये होते, त्यामुळे भन्साळीला एकट्या सलमानला १०० कोटी देणे परवडले नसते. 
 

रणवीर घेऊ शकतो सलमानची जागा... 
अंदाज लावले जात आहेत की, रणवीर सिंह आता या चित्रपटात काम भन्साळींसाठी काम करू शकतो. कारण 'गली बॉय' मध्ये आलिया भट्टसोबतची त्याची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती, त्यामुळे आता हा चित्रपट त्याच्याकडे जाण्याची दाट शक्यता आहे. मात्र अजून कोणतीही अधिकृत घोषणा याबद्दल केली गेली नाही.