आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Get Ultimatum To Leave 'Bigg Boss 13' Show By The Family Due To Poor Health

खालावलेल्या तब्येतीमुळे सलमानच्या कुटुंबीयांनी त्याला दिले 'बिग बॉस 13' सोडण्याचे अल्टीमेटम!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'बिग बॉस 13' सीजन नेहमीच खूप चर्चेत असते. शोच्या चांगल्या टीआरपीमुळे मेकर्सने हा शो आणखी पाच आठवडे वाढवण्याचा निर्णयही घेतला आहे. हा आता शो फेब्रुवारीमध्ये संपणार आहे. शोच्या सततच्या शूटिंग आणि इतर काही कमिटमेंट्समुळे होस्ट सलमान खानची तब्येत आता त्याची साथ देत नाहीये. तो शोदरम्यान खूप चिडलेला दिसत आहे आणि अनेकदा शो सोडण्याचेही त्याने सांगितले आहे. त्याबरोबरच अशातच मिळालेल्या माहिती नुसार, सलमानच्या कुटुंबीयांनीही त्याच्या त्याच्या बिघडत्या तब्येतीमुळे सलमानला शो सोडायला सांगितले आहे.  

ट्रायजेमिनल न्यूरलजियाने पीडित आहे सलमान


डेकन क्रोनिकलमध्ये छापलेल्या रिपोर्टनुसार, सूत्रांशी केलेल्या बातचितीमध्ये त्यांना कळाले आहे की, ट्रायजेमिनल न्यूरलजियाने पीडित असलेल्या सलमानसाठी रागराग करणे योग्य नाही. या आजारामुळे चेहऱ्याच्या मसल्स खेचल्या गेल्याने त्यामध्ये भयंकर वेदना होतात. अशात शोच्या स्पर्धकांच्या हरकतींमुळे जेव्हा सलमानला राग येतो तेव्हा त्याच्या तब्येतीसाठी हे चांगले नसते. सलमान मागील काही सिजन्सपासून शो सोडण्याचा विचार करत आहे. पण दरवेळी चॅनल आणि प्रोडक्शन हाउस त्याला राजी करतात. पण यावेळी सलमान शो सोडण्यासाठी असून बसला आहे. त्याच्या जवळच्यांनी सध्या मेकर्सला ताकीद दिली आहे की, शूटिंगदरम्यान सलमानला जास्त स्ट्रेस देऊ नये. आता पाहायचे हे आहे की, सलमान खरंच शो सोडेल?

'दबंग 3' आणि 'राधे' मध्येही दिसणार आहे सलमान


'बिग बॉस 13' व्यतिरिक्त सलमान 'दबंग 3' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे जो 20 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याव्यतिरिक्त तो 'राधे' चित्रपटाचेही शूटिंग करत आहे, जो पुढाच्यावर्षी ईदला रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...