आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा गर्लफ्रेंडच्या पालकांना बघून तिच्याच घरी लपला होता सलमान, मग एक आवाज झाला आणि रंगेहात पकडला गेला : सुपरस्टारच्या आयुष्यातील दोन रंजक किस्से

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः वयाची 53 वर्षे पूर्ण करणा-या अभिनेता सलमान खानच्या आयुष्यातील अनेक गोष्टी अद्याप त्याच्या चाहत्यांना ठाऊक नाहीत. उदाहरणार्थ,   सलमान त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला तिच्या घरी पोहोचला होता. तेव्हा अचानक तिचे आईवडील तेथे आले. त्यांना बघून सलमान घाबरला आणि इकडे-तिकडे लपण्याचा प्रयत्न करु लागला. त्याला लपण्यासाठी जागा मिळाली खरी, पण शिंक आल्याने तो पकडला गेला होता.


तो किस्सा, जो स्वतः सलमान खानने केला होता शेअर... 
- ही तेव्हाची गोष्ट आहे, जेव्हा सलमानने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले नव्हते. सलमानने सांगितल्यानुसार, गर्लफ्रेंडसोबत तो एका कोठडीत लपला होता. तेथे अतिशय धुळ होती. त्यामुळे त्याला शिंक आली आणि गर्लफ्रेंडच्या आईवडिलांना तो दिसला. पण गर्लफ्रेंडचे आईवडील त्याला काहीच बोलले नाही. कारण ते त्याला पसंत करत होते. त्यांनी प्रश्न न विचारता सलमानला घराबाहेर जाऊ दिले होते.


- पण सलमान त्याच्या कोणत्या एक्स गर्लफ्रेंडविषयी बोलला, हे त्याने स्पष्ट केले नाही. पण बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी सलमानचे अफेअर शाहीन जाफरीसोबत होते. जसीम खान यांनी सलमानची बायोग्राफी 'बीइंग सलमान'मध्ये शाहीनचा उल्लेख सलमानची पहिली गर्लफ्रेंड असा केला आहे. पेशाने मॉडेल असलेली शाहीन जाफरी सलमानचे पहिले प्रेम होते. शाहीन हिंदी सिनेसृष्टीच्या ब्लॅक अँड व्हाइट काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांची नात आहे. अशोक कुमार यांची मुलगी भारतीने अभिनेता सईद जाफरीचा भाऊ हामिद जाफरीसोबत दुसरे लग्न केले होते. हामिद-भारती यांना जेनिव (आडवाणी) आणि शाहीन जाफरी या दोन मुली आहेत. ही प्रेमकथा सलमान स्टार होण्यापूर्वीच सुरु झाली होती. सलमान त्यावेळी मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये व्दितीय वर्षात शिकत होता.


एक किस्सा हासुद्धा : स्कूल टीचरसोबत फ्लर्ट करायचा सलमान
- सलमानने दस का दम सीझन 2 या शोमध्ये सांगितले होते की, शालेय दिवसांत त्याच्या एका शिक्षिकेवर त्याचे क्रश होते. सलमान त्या शिक्षिकेसोबत फ्लर्ट करायचाही प्रयत्न करायचा. सलामन शोमध्ये म्हणाला होता की, एखाद्या व्यक्तीवर क्रश असणे ही अतिशय सामान्य गोष्ट आहे, पण लोक ती स्वीकारत नाही. सलमानने सांिगतले होते, "मी माझ्या एका शिक्षिकेसोबत फ्लट करायचो हे कबुल करायला माझी काहीच हरकत नाही. मी माझ्या स्कूल टीचरला माझ्या सायकलवरुन घरी सोडले आहे. टीजर सायकलच्या दांड्यावर बसावी म्हणून मी जाणूनबूजून सायकलचे कॅरिअर काढून टाकायचो." 

बातम्या आणखी आहेत...