आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दररोज दोन-तीन तास वर्कआऊट करतो सलमान, पहिले तीन दिवस वेट ट्रेनिंग आणि नंतरचे तीन दिवस करतो कार्डिओ एक्सरसाइज, नॉनव्हेज आहे आवडीचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडचा दबंग खान सलमान 53 वर्षांचा होणार आहे. 27 डिसेंबर 1965 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या सलमानचा या वयातील फिटनेस  तरुणांना लाजवणारा आहे.  सलमानने अनेक वर्षांपासून स्वतःचा फिटनेस मेंटेन केला आहे. यासाठी तो कठोर मेहनत घेतो. सलमानला इंडस्ट्रीत फिटनेस गुरु म्हणून ओळखले जाते. तो पहिला असा अभिनेता आहे, ज्याने फिट बॉडी कल्चर बॉलिवूडमध्ये आणले. त्याची पिळदार शरीरयष्टी लक्ष वेधून घेत असते. यासाठी तो कार्डियोवेस्कुलर एक्सरसाइज आणि वर्कआऊट नियमित रुपाने करतो. 

 

असा आहे सलमानचा वर्कआऊट प्लान...
सलमान दररोज 2-3 तास वर्कआऊट करतो. तो आठवड्यातील सुरुवातीचे तीन दिवस वेट ट्रेनिंग एक्सरसाइज करतो आणि इतर तीन दिवस कार्डिओ एक्सरसाइज करतो. जर त्याला दिवसा वर्कआऊटला वेळ मिळाला नाही, तर तो रात्री दोन वाजताही यासाठी वेळ काढतो आणि आवर्जुन व्यायाम करतो. अनेकदा सलमान 10 किलोमीटरपर्यंत सायकलिंग करतो. सोबतच कुठलाही ऋतु असला तर जॉगिंग करणे विसरत नाही. त्याची दिवसाची सुरुवात जॉगिंगने होते.
एक्सरसाइजसोबतच सलमान डाएटविषयीही जागरुक आहे. सुरुवातीला सलमान स्पायसी आणि इटॅलियन खाण्याचा दिवाना होता. पावभाजी, आयस्क्रिम, पिज्झा हे त्याचे आवडते पदार्थ होते. पण जेव्हापासून मनिष  अडविलकर त्याचा जिम ट्रेनर आहे, तेव्हापासून सलमानने हे सर्व पदार्थ खाणे बंद केले. जाणून घेऊयात सलमान सकाळच्या ब्रेकफास्टपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत आपल्या डाएटमध्ये काय काय घेतो...

 

ब्रेकफास्ट
वर्कआऊटपूर्वी सलमान दोन उकळलेल्या अंड्यांचा पांढरा भाग आणि प्रोटीन शेक घेतो. वर्कआऊटनंतर तो बादाम, ओट्स आणि तीन अंड्याचा पांढरा भाग खातो.  नाश्त्यामध्ये तो चार अंडी (फक्त पांढरा भाग) आणि लो फॅट दूध घेतो. 

 

लंच 
लंचमध्ये सलमान नॉन व्हेजमध्ये फ्राइड फिश, मटण खातो. अथवा उकळलेल्या भाज्यांसोबत पाच चपात्या खातो. यासोबतच भरपूर प्रमाणात सलाद आणि फळे खातो. 

 

डिनर
डिनरमध्ये तो उकळलेल्या अंड्याचा पांढरा भाग, मासे किंवा चिकन सूप खातो. स्नॅक्समध्ये तो प्रोटीन बार, नट्स खातो. 


जंक फूडपासून कायम दूर राहतो सलमान...
सलमान जंक फूड मुळीच खआत नाही. त्याच्या डेली डाएटमध्ये मीट, फळ आणि हिरव्या भाज्या असतात. सलमान खोड खाणे टाळतो. त्याच्या मते, खोड पदार्थ तब्येतीला नुकसान पोहोचवणारे असतात. सलमान त्याच्या डाएटमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन घेतो.  


एकेकाळी कुटूंबापासून लपून करायचा वर्कआऊट
- एकेकाळी सलमान कुटूंबापासून लपून वर्कआऊट करायचा. या गोष्टीचा खुलासा जसीम खानचे पुस्तक 'बीइंग सलमान' मध्ये केला आहे. त्याने या गोष्टी कुटूंबापासून लपवल्या कारण, ते फिटनेसविषयी एवढे एक्सायटेड नव्हते. या पुस्तकात लिहिले आहे की, खान कुटूंबाच्या परिचित व्यक्तीने जर सलमानला वर्कआऊट करताना पाहिले तर तो त्यांना 100 रुपयांची लाच द्यायचा. कारण त्याने कुटूंबाच्या व्यक्तीला याविषयी सांगू नये. मोहनीश बहल यांचा दाखला देऊन पुस्तकात हा खुलासा केला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...