आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan About Hitting Aishwarya Rai In Interview Video Going Viral In Mid Of #MeToo Movement

#MeToo:ऐश्वर्याने पीडित महिलांना केला सपोर्ट, ऐकेकाळी ऐकवली होती, आपल्या टॉर्चरची कहाणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. तनुश्री दत्ताने नाना पाटेकर आणि एक टीव्ही प्रोड्यूसरने आलोक नाथवर सेक्शुअल हरॅशमेंटचा आरोप लावला होता. #MeToo कँपेनमध्ये प्रत्येक दिवशी महिला आपली आपबीती घेऊन समोर येत आहेत. याच काळात ऐश्वर्या राय म्हणाली आहे की, महिला आपली कहाणी सांगण्यासाठी स्वतंत्र झाल्या आहेत ही चांगली गोष्ट आहे. छळ हा इंडस्ट्रीमध्ये नवीन नाही, परंतु आता जनता हे गंभीरतेने घेत आहे ही गोष्ट चांगली आहे. ऐश्वर्याच्या आयुष्यातही #MeToo मोमेंट आलेली आहे. तिने सलमान खानवर मारहाण केल्याचे आरोप लावले होते. याच काळात सोशल मीडियावर सलमान खानची एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये जर्नलिस्ट सलमानला विचारतात की, तुम्ही कधी कुणी महिलेवर हात उचलला आहे का? उत्तर देताना सलमान म्हणाला की, आता एका महिलेने असे म्हटले आहे तर यावर न बोलणे चांगले राहिल. जर्नलिस्ट विचारते की, तुम्हाला यावर बोलायचे नाही का? तर सलमान उत्तर देतो की, - "एकदा एका पत्रकाराने मला हाच प्रश्न विचारला होता. हे ऐकूण मी जोरात टेबलवर हात मारला. जर्नलिस्ट यावेळी चकीत झाला. टेबल जवळपास मोडला. जर मी ऐवढा तिरस्कार करत असेल, जर माझी कुणासोबत लढाई होत असेल तर मी पुर्ण ताकद लावून मारेल आणि मी असे केले तर ती वाचणार नाही."

 

ऐश्वर्या म्हणाली होती - नशीब माझ्या शरीराव मारहाणीच्या खुणा नाहीत 
- ऐश्वर्या रायने सलमानवर 2002 मध्ये रिलेशनशीप दरम्यान मारहाण केल्याचे आरोप लावले होते. TOI ला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्या म्हणाली होती, "सलमान ब्रेकअप स्विकारु शकला नाही. तो सतत मला फोन करुन त्रास देत होता."
- ऐश्वर्याने सांगितले होते, "सलमान नेहमी माझ्यावर संशय घ्यायचा. त्यांला वाटत होते की, को-स्टार्ससोबत माझे अफेअर आहे. अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत प्रत्येकासोबत माझ्या लिंकअपच्या गोष्टी होत होत्या."
- "एक काळ असा आला होता जेव्हा सलमान मला मारहाण करु लागला. नशीब की माझ्या शरीरावर काही निशाण झाले नाही. ऐवढे होऊनही मी सकाळी काहीच न झाल्यासारखे कामावर जायचे."
- ऐश्वर्याने सांगितले होते, "मी सलमानची दारुची सवय आणि त्यानंतर केल्या जाणा-या मारहाणीमुळे त्रासले होते. तो माझ्यासोबत वर्बल, फिजिकल आणि इमोशनल एब्यूज करत होता. अनेक वेळा तर माझा मान-सन्मान आणि स्वाभिमानाला ठेच पोहोचवणा-या गोष्टी करायचा. कोणतीही स्वाभिमानी मुलगी अशा गोष्टी सहन करु शकत नाही. याच कारणांमुळे मी सलमानसोबत नाते संपवण्याचा निर्णय घेतला."

 

...रात्रभर ऐश्वर्याचे दार ठोठावत होता सलमान 
- दोघांनी पहिल्यांदा 'हम दिल दे चुके सनम'(1999) मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटाच्या सेटवर त्यांचे अफेअर सुरु झाले. 
- 1-2 वर्षे दोघांचे नाते चांगले होते नंतर सलमानच्या वाईट वागण्यामुळे ब्रेकअप झाले. सलमान अनेक वेळा अर्ध्या रात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचून तिचे दार ठोठावत होता.
- एकदा तर सलमान रात्री ऐश्वर्याच्या घरी पोहोचला आणि तिचा दरवाजा जोरजोरात वाजवू लागला. तो रात्री 3 वाजेपर्यंत दार वाजवत राहिला, त्याचा हातही जखमी झाला होता. सलमानने रागात बिल्डिंगवरुन उडी मारण्याची धमकी दिली होती. 
- सलमानला ऐश्वर्यासोबत लग्न करायचे होते यामुळे तो असे करत होता. नंतर सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला ऐश्वर्याला गमवायचे नव्हते आणि याच भितीमुळे तो एवढा वायलेंट होत होता. 
 

बातम्या आणखी आहेत...