आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan And Aamir Khan Will Again Be Together In The Sequel Of 'Andaj Apna Apna' Movie

सलमान खान आणि आमिर खान करणार एकत्र काम, चित्रपट 'अंदाज अपना अपना' च्या सिक्वलची झाली घोषणा   

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 
एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान आणि आमिर खान स्टारर सुपरहिट चित्रपट 'अंदाज अपना अपना' च्या सीक्वलबद्दल यामागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. सुरुवातीला रणवीर सिंह आणि वरुण धवन यांचे नाव यासाठी समोर येत होते पण आता मात्र चित्रपटाचे लेखक दिलीप शुक्लाने कंफर्म केले आहे की, चित्रपटाच्या सीक्वलमध्ये सलमान आणि आमिर हे दोघेही दिसणार आहेत. 

 

‘डेकन क्रॉनिकल’ ला दिलेल्या एका इंटरव्यूमध्ये दिलीप शुक्ला यांनी सांगितले की, 'कोणत्याही चित्रपटाचा सीक्वल लिहिणे थोडे अवघड असते. मी याचा सीक्वल लिहीत आहे. हे सोपे नाही. मला यामध्ये मागच्या चित्रपटापेक्षा काहीतरी खास लिहावे लागणार आहे.’ ते पुढे म्हणाले, ‘अंदाज अपना अपना' चित्रपटाचा सीक्वल सलमान खान आणि आमिर खान यांच्याविना पूर्ण होऊ शकत नाही. चित्रपटात तीन नव्या कलाकारांसोबत सलमान आणि आमिरदेखील नक्कीच दिसणार आहेत.’ 

 

चित्रपटाशी निगडित एका सूत्राने सांगितले की, चित्रपटाचा सीक्वल मोठ्या लेव्हलवर करण्याची तयारी सुरु आहे आणि मेकर्स कोणतीही घोषणा करण्यापूर्वी सर्वकाही ठरवू इच्छितात. रणवीर सिंह आणि वरुण धवनला चित्रपटाच्या सीक्वलसाठी अप्रोच केले गेले होते, मात्र त्यांच्या भूमिका आधीच्या चित्रपटापेक्षा खूप वेगळ्या असतील.