आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील मुस्लिम, आई आहे हिंदू आणि ख्रिश्चन, अशी आहे सलमानची Family, एका वहिनीचे आहे फॅशन स्टोअर तर एक घटस्फोटानंतर चालवते योग सेंटर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः आज (27 डिसेंबर) बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानचा 53 वा वाढदिवस आहे. सलमानचे कुटुंब बी टाऊनमधील चर्चित घराण्यांपैकी एक आहे. सलमान आपल्या घराला 'मिनी इंडिया' म्हणतो. त्याचे कारणही खास आहे. सलमानच्या कुटुंबात हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील लोक एकत्र एका छताखाली वास्तव्याला आहेत. त्याचे वडील मुस्लिम तर आई हिंदू आहे. तर सावत्र आई हेलन या ख्रिश्चन आणि धाकटा भाऊ सोहेल खानची पत्नी सीमा पंजाबी आहे. अरबाजची पत्नी मलायकासुद्धा पंजाबी आहे. पण आता दोघांचा घटस्फोट झाला आहे.


स्वतःला भारतीय असल्याचे सांगतो सलमान.. 
एप्रिल 2015 मध्ये जोधपूर कोर्टात सलमानने आपला धर्म भारतीय सांगितला होता. काळवीटाची शिकार आणि बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुरु असलेल्या खटल्याच्या सुनावणीत कोर्टाने सलमानला त्याचा धर्म विचारण्यात आला होता. त्यावर सलामानने उत्तर दिलेे होते, 'मी भारतीय आहे'. कोर्ट म्हणाले, 'देशातील प्रत्येक नागरिक भारतीय असतो. तुझी नेमकी जात कोणती' असा प्रतिप्रश्न केला. त्यावर सलमान म्हणाला, 'माझी आई हिंदू तर वडील मुसलमान आहे. त्यामुळे माझा धर्म आणि जात 'भारतीय'च असल्याचे मी मानतो.'


1964 साली झाले होते सलीम आणि सुशीला यांचे लग्न.. 
सलमानचे वडील सलीम खान हे प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर आहेत. 1964 मध्ये त्यांनी सुशील चरक यांच्यासोबत लग्न केले. सुशीला यांचा जन्म मराठी हिंदू कुटुंबात झाला. लग्नाच्या वेळी सुशीला यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करुन स्वतःचे नाव सलमा असे ठेवले. त्या सलीम खान यांच्या पहिल्या पत्नी आहेत. अभिनेत्री हेलन यांच्यासोबत सलीम खान यांनी दुसरे लग्न केले. हेलन या ख्रिश्चन आहेत.


वडीलच नव्हे तर सलमानच्या धाकट्या बहीणभावंडांनी दुस-या धर्माच्या लोकांशी लग्न केले आहे. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या कोणत्या फॅमिली मेंबरने कोणत्या धर्मात लग्न केले...

 

बातम्या आणखी आहेत...