आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन प्रीमियरच्या प्रसंगी सलमान खानने त्याच्या सुरक्षा रक्षकाच्या कानशिलात लगावली, हे होते कारण 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि वाद हे समीकरण बॉलीवूडला काही नवीन नाही. नेहमीच सलमान कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत असतो. यावेळी असेच झाले. सलमान खानचा चित्रपट 'भारत' चे मंगळवारी मीडिया आणि सेलिब्रिटीजसाठी स्क्रीनिंगचे आयोजन केले गेले होते, ज्यामध्ये सलमानदेखील हजर होता. सलमान जसा स्क्रीनिंगमधून बाहेर पडला तसे त्याच्या चाहत्यांनी त्याला घेरायला सुरुवात केली. त्या गर्दीत एक छोटा मुलगा सलमानला पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी त्याच्याकडे येऊ लागला पण सिक्योरिटी गार्डने त्या मुलाला बाजूला ढकलले, जे की, सलमानला अजिबात आवडले नाही. एका लहान मुलाबरोबर आपल्या गार्डचे असे वर्तन पाहून सलमान भडकला आणि त्याने थेट गार्डच्या कानशिलात लगावली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...