आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्क : साउथच्या चित्रपटांतील स्टार व्यंकटेश दग्गुबतीची मुलगी आश्रिता शनिवारी विवाहबंधनात अडकली. तिचे लग्न जयपुरमध्ये झाले. आश्रिताने बॉयफ्रेंड विनायक रेड्डीसोबत लग्न केले. विनायक, हैदराबाद रेस क्लबचे चेयरमॅन आर सुरेंद्र रेड्डी यांचा नातू आहे. या लग्नासाठी बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान आला होता. सलमान आणि व्यंकटेश खूप चांगले मित्र आहेत. सलमानव्यतिरिक्त फिल्म 'मैंने प्यार क्यों किया' आणि 'गॉड तुस्सी ग्रेट हो' अशा चित्रपटांत काम केलेली भिनेत्री बीना काक यादेखील येथे हजार होत्या. बीना यांनी सलमानच्या चित्रपटांत त्यांच्या आईचा रोल केला आहे.
चिरंजीवी आणि नागार्जुन यांचे मुलगा-सून हेदेखील पोहोचले...
लग्नात चिरंजीवीचा मुलगा रामचरण तेजा आणि सून उपासना हेदेखील पोहोचले होते. त्याबरोबरच नागार्जुनच मुलगा नागा चैतन्य आणि सून समांथा यांनी या लग्नाला हजेरी लावली होती. फिल्म 'बाहुबली' मध्ये भल्लालदेवची भूमिका करणारा राणा दग्गुबती आणि 'ओ ओ जाने जाना' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेला सिंगर कमाल खान हेसुद्धा या लग्नासाठी उपस्थित होते. व्यंकटेश यांनी साउथ चित्रपटांसोबतच काही बॉलिवूडच्या चित्रपटातही काम केले आहे. करिश्मा कपूरसोबत त्यांची फिल्म 'अनाड़ी' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरली होती. आश्रिताव्यतिरिक्त व्यंकटेश यांना हयावाहिनी आणि भावना या दोन मुली आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.