आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo Leak: समोर आले Bigg Boss-12 च्या घराचे पहिली दृश्य, यंदा आकाशी रंग असणार थीम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस' सीझन 12 सुरू होण्यासाठी फक्त 5 दिवस उरले आहेत. सुरू होण्यापूर्वीच सलमान खानचा हा शो चर्चेत आहे. बिग बॉसशी संबंधित प्रत्येक छोटीशी गोष्ट सुद्धा जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत शोमध्ये सहभागी होणाऱ्या एका कंटेस्टंटसह सलमानच्या फी संदर्भातील खुलासा झाला आहे. परंतु, बिग बॉसचे नवीन घर नेमके कसे दिसणार किंवा त्याची थीम कशी असणार याचे सर्वांना वेध लागले आहे. एंटरटेनमेंट पोर्टल बॉलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार, 'बिग बॉस' च्या घराचा पहिला फोटो लीक झाला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


फोटोमध्ये बिग बॉसच्या घराचा सॅटेलाइट व्यू आहे. वरून पाहिले असता त्याचा रंग आकाशी असल्याचे दिसून येते. आजूबाजूला हिरवळ सुद्धा दिसून येते. पुढील 3 महिन्यांसाठी सेलिब्रिटी आणि कॉमनर्समध्ये प्रेम आणि वाद याच घरात रंगणार आहे. 'बिग बॉस'चा पहिला एपिसोड 16 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता ऑन एअर होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'बिग बॉस 12' मध्ये श्रीसंत, अनूप जलोटा, सृष्टी रोडे, डैनी डी- माहिका शर्मा, करणवीर बोहरा, स्कारलेट एम रोझ, दीपिका कक्कड, भारती सिंह-हर्ष लिम्बाचिया आणि शालीन भनोट इत्यादी सिलेब्स दिसणार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...