आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Birthday Special His Special Relation With Rukmani Bhatia Who Belongs To Indore

77 वर्षीय वृद्ध महिलेसोबत आहे सलमान खानचे खास नाते, एका खोलीत काढतेय म्हातारपण, सलमानच्या जन्मावेळी सलीम खान यांनी दिली होती 100 रुपयांची नोट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खान आज (27 डिसेंबर) 53 वर्षांचा झाला आहे. इंदूर येथील एका खासगी रुग्णालयात त्याचा जन्म झाला. येथील एका 77 वर्षीय वृद्ध महिलेसोबत सलमान खानचे खास नाते  आहे. सलमानच्या जन्माच्या वेळी रुक्मिणी बाटी त्याची दाई होत्या. सलमा खान यांच्या डिलिव्हरीपासून ते सलमानची मालिश करण्याची जबाबदारी रुक्मिणी यांनी पार पाडली होती. काही वर्षांपूर्वी सलमान त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने इंदूरला गेला होता. सलमानला एका खोलीत म्हातारपण काढणा-या रुक्मिणी यांच्याविषयी समजल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी हॉटेलवर बोलावून घेतले होते. तेव्हा रुक्मिणी त्यांच्या दोन नातीसोबत सलमानला भेटली होती. 


जन्मला तेव्हा चार किलो वजनाचा होता सलमान खान...  

- सलमान खानचा जन्म इंदूर येथील कल्याणमल नर्सिंग होममध्ये झाला होता. इंदूर मध्ये सलमानच्या वडिलांचा सलीम खान यांचे घर होते. हॉस्पिटलपासून काही अंतरावरच त्यांचे घर होते. आता सलीम यांचे मोठे भाऊ बटवा मियां यांची मुलं येथे राहातात. सलमान खान यांचे वडिलोपार्जित घर आता पाच मजली बिल्डिंगमध्ये बदलले आहे. 
- सलमानच्या जन्मावेळीच्या आठवणींना उजाळा देताना त्याची दाई माँ रुख्मिणी भाटी सांगतात की, जन्मावेळी सलमानचे वजन 4 किलोच्या आसपास होते. तेव्हा तो गोल-मटोल आणि गोरापाण होता. जन्मानंतर आई सलमा आणि सलमान दोघेही 12 दिवस हॉस्पिटलमध्ये होते. तेव्हा सलमानची अंघोळ आणि त्याला मालिश करण्याचे काम दाई राहिलेल्या रुख्मिणी करत होत्या. 
- रोज तासभर मी सलमानची मालिश करत होते असे रुख्मिणी भाटी यांनी सांगितले होते.

 

तेव्हा मिळाला होता 100 रुपये इनाम 
- रुख्मिणी भाटी यांनी सांगितले होते की, सलमा यांना 26 तारखेला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते, आणि 27 डिसेंबरच्या सकाळी 10-11 दरम्यान सलमानचा जन्म झाला होता. जेव्हा ही बातमी मी सलीम साहेबांना सांगितली तेव्हा त्यांनी आनंदाने 100 रुपये मला बक्षिस दिले होते. त्या काळात ही फार मोठी रक्कम होती.

  

बातम्या आणखी आहेत...