आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी कॉलेजबाहेर तासन्तास उभा राहायला सलमान खान, कुटुंबीयांनाही मान्य होते दोघांचे नाते... पण होता-होता राहिले लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्क- अभिनेता सलमान खान आज (27 डिसेंबर) वयाची 53 वर्षे पूर्ण करत आहे. इंदूर येथे जन्मलेल्या सलमानने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. एकीकडे त्याने सिनेसृष्टीत नाव कमावले तर दुसरीकडे त्याच्या रोमान्सचे किस्सेही खूप गाजले. सलमान 19 वर्षांचा असताना तो पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आला होता. जसीम खान यांनी सलमानची बायोग्राफी 'बीइंग सलमान'मध्ये त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंड आणि त्याच्याशी निगडीत काही किस्से शेअर केले आहेत. हे किस्से कधीच समोर आलेले नव्हते. सलमानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती ती, कशी दोघांची भेट झाली, कसे दोघे वेगळे झाले, कुणामुळे हे नाते संपुष्टात आले. जसीम यांच्या पुस्तकातील काही पानांवर दिलेली ही लव्हस्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

 

गतकाळातील सुपरस्टारची नात आहे सलमानची पहिली गर्लफ्रेंड...

- पेशाने मॉडेल असलेली शाहीन जाफरी सलमानचे पहिले प्रेम होते. 
- शाहीन हिंदी सिनेसृष्टीच्या ब्लॅक अँड व्हाइट काळातील सुपरस्टार अशोक कुमार यांची नात आहे. 
- अशोक कुमार यांची मुलगी भारतीने अभिनेता सईद जाफरीचा भाऊ हामिद जाफरीसोबत दुसरे लग्न केले होते. हामिद-भारती यांना जेनिव (आडवाणी) आणि शाहीन जाफरी या दोन मुली आहेत. 
- ही प्रेमकथा सलमान स्टार होण्यापूर्वीच सुरु झाली होती. सलमान त्यावेळी मुंबईच्या सेंट झेव्हिअर कॉलेजमध्ये व्दितीय वर्षात शिकत होता.

शाहीनच्या कॉलेज बाहेर तासन्तास उभा राहत होता सलमान...
- शाहीन जाफरीसोबत होता तेव्हा सलमान 19 वर्षांचा होता. 
- त्याकाळी लाल रंगाची स्पोर्ट कार नेहमी सेंट झेव्हिअर कॉलेज बाहेर उभी असायची कारण तिथे शाहीन शिकत होती. 

 

...परंतु दोघांच्या मध्ये आली संगीता बिजलानी
- विश्वदीप घोष यांनी 'हाल ऑफ फेम सलमान खान'मध्ये लिहिले आहे, 'सलमानने शाहीनला गर्लफ्रेंड म्हणून कुटुंबीयांना भेटवले होते. दोघांच्या घरच्यांनी त्यांना परवानगी दिली होती. म्हणून अपेक्षा होती, की या नात्याचे रुपांतर लवकरच लग्नात होईल. परंतु असे होऊ शकले नाही. कारण त्याकाळी प्रसिध्द मॉडेल आणि 1980मध्ये मिस इंडिया राहिलेली संगीता बिजलानी या नात्यात आली.'
 - त्या दिवसांत संगीता बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर एकटी पडली होती. ती नेहमी 'सी रॉक' हॉटेलच्या हेल्थ क्लबमध्ये दिसत होती. सलमान शाहीनसोबत तिथे जात होता.

 

स्वत: सलमानपासून दूर झाली शाहीन...
वयाने मोठी असलेल्या संगीताच्या मॅच्युरिटीमुळे सलमान तिच्याकडे आकर्षित झाला. मात्र, नंतर सलमाननेसुध्दा सांगितले होते, की शाहीनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर संगीता त्याच्या आयुष्यात आली होती. परंतु सत्य असे आहे, की सलमान दोन्हीकडे गुरफटला गेला होता. तो यातून बाहेर पडू शकत नव्हता. 
 - सलमानच्या आयुष्यात संगीता बिजलानी आल्यानंतर शाहीन जाफरीने कॅथ पॅसिफीक एअरलाइन्समध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली आणि सलमानपासून दूर झाली.

 

शाहिनची मुलगी आहे अभिनेत्री..
- शाहिनचे लग्न 1990मध्ये अभिनेता सुमीत सहगलसोबत झाले होते. 
- पण फार काळ हे लग्न टिकले नाही. 2003 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. 
- घटस्फोटानंतर सुमीतने अभिनेत्री फराह नाज (तब्बूची बहीण) सोबत दुसरे लग्न केले.  फराहचेसुद्धा हे दुसरे लग्न आहे. तिचे पहिले लग्न विंदू दारा सिंगसोबत झाले होते. पहिल्या लग्नापासून फराहला एक मुलगासुद्धा आहे. 
- तर शाहिन आणि सुमीत यांचीदेखील एक मुलगी असून सायशा सहगल हे तिचे नाव आहे. 
- सायशाचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण झाले आहे. 
-अजय देवगणच्या 'शिवाय' या चित्रपटात सायशा झळकली होती. 

 

एक्स गर्लफ्रेंड्सची मदत करतो सलमान... 
गर्लफ्रेंड्स (संगीता बिजलानी, सोमी अली, कतरिना कैफ, लुलिया वंतूर) पैकी सलमान आता फक्त ऐश्वर्या रायच्या संपर्कात नाही. संगीता ही सलमानच्या कुटुंबीयांच्या आजही जवळ आहे. ती कायम सलमानच्या कुटुंबात होणा-या सणसमारंभात सहभागी होत असते. तर सोमी अलीच्या दुबईतील एनजीओला डोनेशन देण्यासोबतच सलमानने काही वर्षांपूर्वी तिला फ्लॅट गिफ्ट केला होता. इतकेच नाही तर कतरिनाचे सेल्स आणि इनकम टॅक्सचे काम सलमानचे वकीलच बघतात. 

बातम्या आणखी आहेत...