आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'साहो'मध्ये पाहायला मिळेल सलमान खान, नील नितीन मुकेशच्या सांगण्यावरून निर्मात्यांनी कॅमिओसाठी केली आहे विचारणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्क- "बाहुबली" फेम अभिनेता प्रभास लवकरच त्याच्या आगामी "साहो" या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. चित्रपटात प्रभाससोबत श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश यांचेही महत्त्वाचे रोल्स असणार आहेत. यातच आता चित्रपटात बॉलीवूड सुपरस्तार सलमान खानदेखील दिसणार असल्याचे बोलले जात आहे. नील नितीन मुकेशच्या सांगण्यावरून मेकर्सनी त्याला चित्रपटात कॅमिओसाठी विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे.


सलमानने दिले नाही उत्तर
इंग्रजी वृत्तपत्र 'डेक्कन क्रोनिकल'च्या एका रिपोर्टनुसार नीलने मेकर्सना सलमानच्या नावाचा विचार करण्यास सांगितले आहे. नील आणि सलमान खूप चांगले मित्र आहेत. त्या दोघांनी सोबत "प्रेम रतन धन पायो" चित्रपटात काम केले आहे. चांगल्या ट्यूनिंगमुळे नीलला वाटत होते की, सलमान या चित्रपटात कॅमिओ करावे. त्याच्या सांगण्यावरून मेकर्सनी सलमानला विचारणा केली असल्याची माहिती आहे. तुर्तास सलमानकडून त्यांना काहीच उत्तर मिळाले नाहीये, पण आशा केली जात आहे की, सलमान चित्रपटात कॅमिओ करेल. सध्या सलमान त्याच्या आगामी "भारत" च्या प्रमोशनमध्ये आणि "दबंग 3"च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचा "भारत" 5 जूनला रिलीज होणार आहे. "दबंग 3" नंतर तो संजय लीला भंसाळीच्या "इंशाअल्लाह"ची शूटिंग करणार आहे.


15 ऑगस्टला रिलीज होईल 'साहो'
"साहो" एक अॅक्शन चित्रपट आहे आणि याला सुजीत दिग्दर्शित करत आहे. चित्रपटात अरुण विजय आणि जॅकी श्रॉफ सपोर्टिंग रोलमध्ये दिसतील. चित्रपटाचे संगीत शंकर एहसान लॉय यांनी दिले आहे. चित्रपट 15 ऑगस्टला रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...