Salman / सलमानने रद्द केला कॅनडाचा दौरा, मिका सिंहच्या पाकिस्तान वादानंतर घेतला निर्णय

सलमानने रद्द केला कॅनडाचा दौरा

Sep 09,2019 12:06:00 PM IST

सलमान खान या महिन्याच्या सुरुवातीलाच कॅनडा आणि यूएसच्या काही शहरात जाणार होता. या दौऱ्यात तो त्याच्या चाहत्यांसोबत काही खास सेशन्स करणर होता. शिवाय या सर्व कार्यक्रमात त्याची एक मुलाखतदेखील होणार होती. मात्र आता सलमानने हा दौरा रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता तो पुढच्या वर्षी होईल.


सूत्रांनुसार..., 'या कार्यक्रमात सलमान आपला मित्र आणि गायक कमाल खानसोबत जाणार होता आणि मीका सिंहसुद्धा त्याच्यासोबत जाणार होता. पाकिस्तानात सादरीकरणावरून मिकाचा वाद आधीच सुरू आहे, त्यामुळे आपल्या कार्यक्रमावरही याचा वाईट परिणाम होईल, असे सलमानला वाटले असावे. त्यामुळे त्याने शोच रद्द केला. मात्र मिकाने निर्मात्यांशी संवाद साधून हा प्रश्न सोडविला होता. परंतु हे प्रकरण अद्याप थंड झाले नाही, असे सलमान म्हणतो. सलमान सध्या 'दबंग 3' च्या शूटिंगमध्ये आहे आणि त्यानंतर तो 'बिग बॉस 13' वर काम सुरू करणार आहे.

X