आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत सलमान खानने साजरा केला वाढदिवस, भाचा आहिलसोबत कापला केक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील सलीम खान आणि भाचा आहिलसोबत केक कापताना सलमान खान, उर्वशी रौतेला, आयुष शर्मा, कतरिना कैफ, हुमा कुरैशी यांनी पार्टीला हजेरी लावली. - Divya Marathi
वडील सलीम खान आणि भाचा आहिलसोबत केक कापताना सलमान खान, उर्वशी रौतेला, आयुष शर्मा, कतरिना कैफ, हुमा कुरैशी यांनी पार्टीला हजेरी लावली.

एंटरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खानचा आज (27 डिसेंबर) वाढदिवस असून त्याने वयाची 54 वर्षे पूर्ण केली आहे. वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजे गुरुवारी सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या मुंबईतील पाली हिलस्थित घरी एका जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत सलमानचे संपूर्ण कुटुंबीय सहभागी झाले होते. सलमानचे आईवडील सलमा खान आणि सलीम खान सोहेलच्या घरी पोहोचले होते. सोबतच त्याची सावत्र आई हेलन यांनीही या पार्टीला हजेरी लावली. अर्पिता  आणि अलविरा या त्याच्या बहिणीदेखील पती आणि मुलांसोबत येथे दाखल झाल्या.

  • इनसाइड फोटो आले समोर..

सलमानच्या बर्थडे पार्टीचे काही इनसाइड फोटो समोर आले आहेत. यापैकी एका फोटोत सलमान त्याचा भाचा आणि अर्पिताचा मुलगा आहिलसोबत केक कापताना दिसतोय. तर आणखी एका फोटोत त्याने अभिनेत्री सौफी चौधरीसोबत पोज दिली आहे. 

  • या सेलेब्सचीही हजेरी...

सलमानच्या बर्थडे पार्टीनिमित्त बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले होते. सलमानची तथाकथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूर, कतरिना कैफ, डेजी शाह, सौफी चौधरी, उर्वशी रौतेला, प्रग्या कपूर, निर्माता निखिल द्विवेदी आणि त्याची पत्नी, रविना टंडन आणि तिचे पती अनिल थडानी, हुमा कुरैशी, साकिब सलीम, बॉबी देओल सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला पोहोचले होते.