आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सलमान खानला झुकावे लागले, आता 'लवरात्रि' नसेल चित्रपटाचे नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सलमानने मेहुणा आयुष शर्माच्या डेब्यू चित्रपटाविषयी एक मोठा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरला रिलीज होणा-या या चित्रपटाचे टायटल आता 'लवरात्री' नसणार आहे. सलमानने बुधवारी रात्री ट्वीट करुन घोषणा केली की, आयुष शर्मा आणि वरीना हुसैन स्टारर चित्रपट 'लवयात्री: अ जर्नी ऑफ लव्ह' या नावाने रिलीज होईल. सलमानने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, "ही स्पेलिंग मिस्टेक नाही नाही... लवयात्री" 

 

जुन्या टायटलमुळे वादात अडकला होता चित्रपट 
- सलमानने आपले प्रोडक्शन हाउस SKF च्या बॅनर खाली डायरेक्टर अभिराज मिनावलच्या या चित्रपटाचे टायटल अनाउंस केले होते, तेव्हाच हा चित्रपट वादात अडकला होता. अनेक सामाजिक संस्थांनी चित्रपटाच्या जुन्या टायटलचा विरोध केला. चित्रपटाचे टायटल न बदलल्यास सूरतमध्ये चित्रपट रिलीज होऊ देणार नाही अशी धमकी विश्व हिंदू परिषदेने दिली होती. या प्रकरणी बिहारच्या मुजफ्फरपुरच्या एका कोर्टात सलमान खान विरुध्द धार्मिक भावनांना ठेच पोहोचवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. कोर्टाने ही तक्रार स्विकारली होती. कोर्टाने पोलिसांना FIR करण्याचा आदेश दिला होता. सलमानने आता चित्रपटाचे नाव बदलले आहे. परंतु तो पहिले म्हणाला होता की, चित्रपटाचे नाव खुप सुंदर आहे आणि धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा कोणताही उद्देश नसल्याचे त्याने सांगितले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...