आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salman Khan Completed 30 Years In Bollywood Bhagyashree's Son Abhimanyu Re Created The Iconic Scene Of 'Maine Pyaar Kiya'

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यूने रिक्रिएट केला सलमान खानच्या 'मैने प्यार किया'चा आयकॉनिक सीन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः रविवारचा दिवस सलमान खान अाणि त्याच्या चाहत्यांसाठी खूपच खास होता. रविवारी सलामनची इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण झाली. याच दिवशी 'मैने प्यार किया'मधून त्याने पदार्पण केले होते. 29 डिसेंबर 1989 मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. त्यामुळे सलमानलादेखील 30 वर्षे पूर्ण झाली आहेत. या दिवसाची आठवण चित्रपटातील हिराेइन भाग्यश्रीच्या अभिमन्यू दसानी या मुलाने खास करून टाकली.  याशिवाय सलमान खान फिल्म्सने देखील इन्स्टाग्राम अकाउंटवर सलमानला ट्रिब्यूट देत एक व्हिडिओ शेअर केला. त्यात 30 वर्षांचा त्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे.

  • सीन केला रिक्रिएट

अभिमन्यूने या चित्रपटातील आयकॉनिक सीन आपल्या 'निकम्मा' चित्रपटातील अभिनेत्री शिर्ले सेतियासोबत मिळून रिक्रिएट केला. विशेष म्हणजे या सीनमध्ये अभिमन्यूने तेच जॅकेट घातले जे सलमानने चित्रपटात घातले होते. लीड अॅक्टर म्हणून सलमानचा हा पहिला चित्रपट होता. सलमान-भाग्यश्रीच्या या चित्रपटाने जवळजवळ चार कोटींचे कलेक्शन केले होते. 

  • सलमान खान फिल्म्सने व्हिडिओ शेअर केला

तीन दशकांच्या कालावधीत सलमानने 'बजरंगी भाईजान' आणि 'सुलतान'सारखे आयकॉनिक चित्रपट दिले जे आजही पसंत केले जातात. दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर 300 कोटींच्या कमाईने यशस्वी ठरले आहेत. इतर चित्रपटांपैकी, सलमान खानच्या सर्वाधिक पसंत झालेल्या चित्रपटांमध्ये 'किक', 'भारत' आणि 'प्रेम रतन धन पायो' यांचा समावेश आहे, हे सर्व 200 कोटींच्या क्लबमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले.

  • 150 कोटींच्या जवळपास पोहोचला दबंग 3

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दबंग 3’ ने बॉक्स ऑफिसवर सर्वांची मने जिंकली आहेत आणि जवळपास 150 कोटींच्या कमाईपर्यंत पोहोचला आहे.  सलमानचा हा सलग पंधरावा चित्रपट असून ज्याने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा पार केला आहे.