आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने लाल किल्ल्यासमोर चालवली सायकल, जाणून घ्या व्हिडिओद्वारे काय सांगू इच्छितो सलमान 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : सलमान खान काही दिवसापासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान नेहमीच कोणते ना कोणते व्हिडीओ आपल्या अकाउंटवर शेअर करत असतो. कधी तो आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतो तर कधी काहीतरी तुफानी करताना. अशातच सलमान खानने आपल्या इंस्टाग्रामवर एक रंजक व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडिओमध्ये सलमान खान लाल किल्ल्यासमोर सायकल चालवताना दिसत आहे. 

 

सोशल मीडियावर सलमान खानचा हा व्हिडीओ खूप पहिला जात आहे आणि यावर खूप वेगवेगळ्या कमेंटदेखील येत आहेत. सलमानने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तो सायकलिंग करण्याचे फायदे सांगत आहे. सलमान म्हणत आहे, 'वातावरण, प्रदूषण, तब्येत आणि कंफर्टसाठी सायकलिंग गरजेचे आहे.' सलमान खान या व्हिडिओद्वारे आसपासचा परिसर प्रदूषणमुक्त बनवण्याचा संदेश देत आहे. सोशल मीडियावर सलमान खानचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. फॅन्सला त्याचा हा व्हिडीओ खूप आवडत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

www.beinghumanecycle.com

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on